सदा सर्वदा स्टार्टअप : ‘फंडिंग राउंड’चे कार्य

बन्सल मंडळींनी स्वत:ची ‘फ्लिपकार्ट’ नामक वेबसाइट बनवायला त्यांच्या पदरचा पैसा वापरला.

0
819
फंडिंग

मी अनेक प्रवर्तकांना भेटत असते, ज्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की एकदा गुंतवणूकदाराने पैसे (फंडिंग) दिले की आपलं आयुष्यच  बदलणार आहे. ‘फ्लिपकार्ट’चं हे उदाहरण मी दर वेळेस देते कारण त्याने बऱ्याच संकल्पना समजायला सोप्या जातात.

बूटस्ट्रॅपिंग

बन्सल मंडळींनी स्वत:ची ‘फ्लिपकार्ट’ नामक वेबसाइट बनवायला त्यांच्या पदरचा पैसा वापरला. बहुतेक स्टार्टअपची सुरुवात ही पदरच्या पैशातून किंवा मित्रमंडळींच्या पैशातून होते.

प्री सीड फंडिंग

या टप्प्यात व्यावसायिक आणि संस्थात्मक भांडवलांची भूमिका फारशी नसते. प्री सीड फंडिंग मिळवण्यासाठी अनुदान किंवा व्यावसायिक स्पर्धा असतात.

सीड स्टेज फंडिंग

जेव्हा स्टार्टअप्ससाठी फंडिंग राउंड कसे कार्य करतात? हा अभ्यास तुम्ही करताय तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल फंडिंग अधिक औपचारिक होण्यास या टप्प्यात सुरुवात होते. या फेरीमध्ये अधिक चांगल्या अटी मिळविण्याकरता बरेच फंड्स स्टार्टअप शोधत असले तरीही सर्वसामान्यपणे  गुंतवणूकदार हा या टप्प्यातला ‘एंजल इन्व्हेस्टर’ असतो.

सीरिज ए फंडिंग

जेव्हा तुम्ही स्टार्टअप्ससाठी फंडिंग राउंड्सच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत आहात, तेव्हा स्टार्टअप फंडिंगचा अधिक काळजीपूर्वक वापर करणे आणि त्यावर देखरेख करणे, हे या टप्प्यात सुरू होते असे लक्षात येईल.