जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही जण फुलं, भेटवस्तू देऊन आपली भावना व्यक्त करतात, तर काही जण खास डेट प्लॅन करून हा दिवस संस्मरणीय करतात. ‘अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या विशेष मुलांनी ही यंदाचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ खास पद्धतीने साजरा केला. प्रेमाचा हा दिवस खास करण्यासाठी या संस्थेतर्फे ‘बेक सेल बोनान्झा’आयोजित करण्यात आला. त्याला विद्यार्थ्यांचे पालक, पाहुणे यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या विशेष मुलांनी तयार केलेली बेकरी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.या खास उपक्रमाला अभिनेता दर्शिल सफारी उपस्थित होता. या मुलांच्या हातची कला थक्क करणारी असल्याची प्रतिक्रिया दर्शिल सफारीने यावेळी व्यक्त केली.

