जनीं वंद्य ते : बाबासाहेब पुरंदरे

या सदरात थोडक्यात जाणून घेऊयात महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल.

573

बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र बाबासाहेब पुरंदरे या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ मध्ये पुण्यात झाला. बाबासाहेबांना शिवशाहीर म्हणून ओळखले जाते, ते भारतातील प्रसिद्ध लेखक आहेत.

जानेवारी २०१९ रोजी त्यांना पद्मविभूषण (भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची कामे मुख्यत: मराठा साम्राज्याचे १६ व्या शतकातील संस्थापक शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित घटनांवर आधारित आहेत;  बाबासाहेब लहान असतानाच त्यांनी “ठिणग्या” हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहले. या शिवाय त्यांनी केसरी हे पुस्तक नारायणराव पेशव्याच्या आयुष्यावर लिहलेले पण त्यांची सर्वात महत्वाची साहित्यकृती म्हणजे जाणता राजा, या पुस्तकावर १९८५ साली सर्वप्रथम नाटक बसवले आणि त्याचे गावागावात १००० पेक्षा जास्त प्रयोग झाले.

जाणता राजा या नाटकाच्या प्रयोगाद्वारे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्येही लोकप्रिय होते.

२०१५ साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.

पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला.

या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.अनेक दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाट्य, या सार्‍या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढ्यांपर्यंत पोहोचविले.

nirmala_poster_aff_2016.jpgबाबासाहेबांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे या समाजकार्यात गुंतलेल्या. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. निर्मलाताई वनस्थळी हि संस्था चालवायच्या. फ्रांस या देशासोबत त्यांनी घनिष्ट संबंध प्रस्थापित केलेले . बाबासाहेब आणि निर्मला याना अमृत आणि प्रसाद हि मुले तर माधुरी हि मुलगी आहे.