शब्दांच्या मागचे शब्द: भाग २ -अगत्य , अगतिक, अगम्य, गमक, गमावणे

या सदरात उगम, व्युत्पत्ति, शब्दार्थ तसेच व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह  जाणून घेता येईल 

538

अगत्य , अगतिक, अगम्य, गमक, गमावणे

संस्कृतमध्ये ‘ये गत्यर्थाः ते ज्ञानार्थाः’ असा सिद्धांत आहे, म्हणजेच जेवढे ‘गमनार्थक’ धातू आहेत ते ‘ज्ञानार्थक’ समजावे. ‘गमने’ यात सतत गमनाची (जाणण्याची, वाटण्याची तसेच हलण्याची, जाण्याची) क्रिया आहे. सरस्वती जशी ज्ञानाची देवता आहे तशीच ती गमनाची द्योतक – नदीदेवता आहे ही कल्पना या सिद्धांताच्या मुळाशी आहे. या अनुषंगाने पुढील शब्दार्थ पाहू-

गम्य = गम् + य = जाणण्यायोगे असे ज्ञान
अगम्य = अ + गम् + य = न जाणण्याजोगे/ न समजण्याजोगे
अगतिक = अ + गम् (गति) + क = गति कुंठित झालेला (अगति), निरुपाय अवस्थेत सापडलेला.
अगत्य = अगति + य = अनिवार्य, आवश्यक, जरुरी, कळकळ, आग्रह या अर्थाने रूढ झाला. हा शब्द ‘अगतिक’ पासून निष्पन्न झाला.

गमावणे = गम् म्हणजे जाणे, गमव म्हणजे जावयास लावणे यावरून फुकट घालवणे, हरवणे.
गमक = चिन्ह, दाखला, कारण

Previous articleExtended Vacation is Enhanced Vocation
Next articleImpact of lockdown on Trade
मराठी भाषेच्या अभ्यासक. डिजिटल मीडियासाठी लघुकथा, लेख आणि ललितलेखन तसेच मराठीतून कायदेविषयक माहिती देणारे लेखन.#मराठीभाषा उपक्रमाला २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट डिजिटल कंटेंटसाठीचा सन्मान प्राप्त. व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी. गेले १५ वर्षे कंपनी कायदा, सेबी रेग्युलेशन संदर्भात सेवा व सल्लागार म्हणून कार्यरत.