25.1 C
Delhi
Thursday, September 28, 2023

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ५ – अध्वर्यु

या सदरात शब्दांचा उगम, व्युत्पत्ति, शब्दार्थ तसेच व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह  जाणून घेता येईल 

Must read

नेहा लिमये
नेहा लिमये
मराठी भाषेच्या अभ्यासक. डिजिटल मीडियासाठी लघुकथा, लेख आणि ललितलेखन तसेच मराठीतून कायदेविषयक माहिती देणारे लेखन.#मराठीभाषा उपक्रमाला २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट डिजिटल कंटेंटसाठीचा सन्मान प्राप्त. व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी. गेले १५ वर्षे कंपनी कायदा, सेबी रेग्युलेशन संदर्भात सेवा व सल्लागार म्हणून कार्यरत.

अध्वर्यु

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिपर्वाचे अध्वर्यु अशी स्वा. सावरकरांची ओळख करून दिली जाते. इथे अध्वर्यु म्हणजे ‘प्रमुख’ असा अर्थ आपण समजून घेतो. हा शब्द यज्ञ-संस्थेतून भाषेत आलेला आहे. कोणत्याही यज्ञामध्ये चार प्रमुख ऋत्विज असतात. होता, अध्वर्यु, उद्गाता आणि ब्रह्मा. त्यांच्यापैकी यज्ञात देवतांना आहुती अर्पिण्याचे काम अध्वर्यूला करावयाचे असते. ‘होता’ हा वेदांमधील मंत्र म्हणून देवतांना आवाहन करतो. ‘उद्गाता’ ते मंत्र कलात्मक पद्धतीने गातो आणि ‘ब्रह्मा’ सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवतो; पण देवतांना प्रत्यक्ष आहुती अर्पण करण्याचे काम अध्वर्यु करतो. त्यामुळे तोच या यज्ञामध्ये सर्वांचे व विशेषत: देवतांचेही लक्ष वेधून घेतो. त्यालाच महत्त्व प्राप्त होते. कारण त्याचे काम सर्वात महत्त्वाचे असते. म्हणूनच कोणत्याही कामात असे महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या व्यक्तीला अध्वर्यु असे म्हणतात.

 

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!