29.1 C
Delhi
Wednesday, September 27, 2023

जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ४

देशावरच्या प्रेमातून झाली निर्मिती एका भक्कम व्यवसायाची ज्याचे नामकरण कालांतराने क्विकहिल असे केले गेले.

Must read

विनय मोघे
विनय मोघे
विनय मोघे हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असले तरी ते एक तज्ज्ञ गुंतवणूकदार आहेत, केवळ नोंदणीकृतच नवे तर खाजगी कंपन्यात देखील त्यांच्या अनेक गुंतवणुका आहेत. 

इंजिनीयरिंगचा अभ्यास यथातथा चालू असताना फावल्या वेळेत संजय रिपेयर्सच्या दुकानात जाऊन बसायला लागला. तेव्हा त्यावेळेस कैलाशकडे काही फ्लॉपी रिपेयर करण्यासाठी आलेल्या त्यावर कोण्या व्हायरसचा आक्रमण झालेल. त्या साफ करून परत द्यायच्या होत्या. कैलाशला वाटलं संजय कॉम्प्युटर इंजिनीरिंग करत आहे तर त्याला या विषयातला ज्ञान नक्कीच असेल म्हणून त्यांनी त्या संजयला दिल्या, संजयला तेव्हा सी प्रोग्रामिंग मनापासून आवडत होतं, त्याने बसल्या बसल्या एकदा या सगळ्या फ्लॉपीज पहिल्या आणि त्यांचा अभ्यास केल्यावर त्याच्या असा लक्षात आलं कि या सगळ्या फ्लॉपीज ब्रेन नावाच्या व्हायरसमुळे खराब होताहेत.

ब्रेन हा पाकिस्तानी अल्वी बंधूंनी बनवलेला व्हायरस असा कुठे तरी संजयच्या वाचनात आलेल.  पाकिस्तान म्हणल्यावर त्याचा डोक्यात अनेक प्रश्न पिंगा घालू लागले, काय हेतू असेल या व्हायरसचा ? भारतात फ्लॉपीज घेणाऱ्या सगळ्या लोकांना आर्थिक नुकसान करणं ? एक फ्लोपी खराब झाली तर कदाचित त्या नुकसानाची कोणाला पर्वा नसेल पण एकाच वेळेस भारतात अशा कित्येक करोडो फ्लॉपीज जर खराब होत असतील तर आपल्या देशाला कित्येक कोटी रुपयांचा भुर्दंड पडत आहे तो कोणासाठी ? कोण आहेत हे अल्वी बंधू ? पाकिस्तानी सरकारचे एजन्ट तर नसतील ? ही पाकिस्तान सरकारची चाल तर नसेल ? आपण आपल्या सरकारला सांगायला पाहिजे का ? आपण तर कोणाला ओळखत पण नाही ? आपल कोणी का ऐकेल ?

त्याने कैलाशला या बद्दल सांगितलं. दोघांनी मग खूप वेळ चर्चा केली आणि त्यांनी हा प्रश्न त्यांच्या पद्धतीने सोडवायचा ठरवलं, प्रत्येक वेळेस शत्रूशी लढायला किंवा देशासाठी काही तरी करण्यासाठी सीमेवरच जायला लागत असं नाही, बरेचदा आपण आपल्या कर्माने सुद्धा देशाचे पाईक होऊ शकतो, या व्हायरसला सळो कि पळो करून टाकण्यासाठी आपण तंत्रज्ञान तर बनवू शकतो, हेच असेल देश बांधवांसाठी दिलेल  किमान योगदान.

मग काय लाहोरच्या अल्वी बंधूंविरुद्ध पुण्याचे काटकर बंधू शड्डू ठोकून उभे राहिले, तेव्हा त्यांच्या डोक्यात पण नव्हते कि आपण इतिहास घडवत आहोत, तेव्हा त्यांचा डोक्यात होती ती राष्ट्रभक्ती, देशावरच प्रेम, पाकिस्तानी हॅकर्स भारतातल्या जनतेला त्रास देताहेत, कम्प्युटर, फ्लॉपीज खराब करताहेत, हे त्यांच्या मनाला ना पटणार होतं. सरकार जे काही करेल ते करेल पण हा हल्ला आपल्या देशावर होतो आहे हे पाहून संजयला काही चैन पडत नव्हत, त्या वेळी त्याच्या डोक्यात फक्त एकाच भावना होती कि हा हल्ला परतवून लावायलाच पाहिजे, आपल्या देशबांधवांचं आयुष्य सुरळीत झालच पाहिजे. या ईर्ष्येने मग संजय पेटून उठला आणि कित्येक रात्री त्याने जागून काढल्या, त्याला सरते शेवटी एक जालीम उपाय सापडला, हा ब्रेन व्हायरसला हाकलून देऊन फ्लॉपीज साफ करायच आणि यातून लिहला गेला पहिला अँटी व्हायरसचा प्रोग्रॅम.

या नंतर संजयला असे कोड लिहायची गोडी वाटू लागली. मग मायकेल अँजेलो नावाच्या व्हायरसवर संजयने अजून एक अँटी व्हायरस कोड लिहिला. तो काळ इंटरनेटचा नव्हता त्यामुळे आजच्या सारखे काही तासात नवीन व्हायरस जन्माला येत नव्हते, इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षात असताना संजयने चार पाच अँटीव्हायरसचे कोड लिहिले, प्रत्येक व्हायरससाठी वेगळा कोड बनवायला त्याला २-३ दिवस लागायचे. मग या सगळ्या कोड्सचा एक संग्रह बनवून त्याने कैलाशकडे दिला आणि कैलाश त्याचा उपयोग संगणक रिपेयर करायला करू लागला. दरम्यान संजयचे शिक्षण चालू राहिले, मास्टर्ससाठी संजयने वाडिया कॉलेजला ऍडमिशन घेतली. पण बराच वेळ संजय आपल्या मोठ्या भावाच्या दुकानावर काढत होता, येणाऱ्या नवीन व्हायरसना तटवून लावायला शक्कल लढवत होता, शिक्षण संपे पर्यंत त्याच्याकडे अँटी व्हायरसच्या कोड्सचा मोठा संन्ग्रह जमा झाला. जोपासना नावाच्या कंपनी मध्ये संजयने त्याची इंटर्नशिप चालू केली, जोपासना हि पुण्यातली बरीच जुनी सॉफ्ट्वेएयर कंपनी १९९०साली अजय फाटक आणि किरण नातू यांनी चालू केलेली कंपनी, ही कंपनी पुढे एका बलाढ्य अमेरिकन कंपनी ने विकत घेऊन टाकली हा भाग अलाहिदा. कालांतराने याच जोपासना कंपनीने त्याला नोकरीची ऑफर दिली.

संजयने कैलाशला विचारल काय केल पाहिजे ? कैलाश म्हणाला तू इतक्या मेहनतीने जे कोड लिहले आहेत त्याचा एकच अँटीव्हायरस सॉफ्टवेयर बनव जे आत्ता अस्तित्वात असलेल्या सगळ्या व्हायरस सोबत लढेल आणि त्यांचा नायनाट करेल. संजयला हा त्याचा सल्ला मानवला. संजयने एक महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतला, सगळे कोड एकत्र करायचा आणि इथेच झाली क्विकहिलची पायाभरणी. १९९३ चा सुमार असेल तो जेव्हा संजयने सगळे कोड एकत्र करून त्याला व्यवस्थित पॅकिंग करून त्याचे रूपांतर एका सॉफ्टवेयर प्रॉडक्टमध्ये केले. काळानुसार लिहलेल्या विखुरलेल्या विविध कोड्स मधून एक प्रॉडक्ट बने पर्यंत दोन वर्षांचा कालावधी गेला. एका फ्लॉपीवर १८-२० वेगवेगळ्या कोड्सना एकत्र करून बनवलेलं हे प्रकरण डॉस ऑपरेटिंग सिस्टिम वरच पाहिलं प्रॉडक्ट.

भाग एकभाग दोनभाग तीन । भाग पाच

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!