एंटरटेनमेंट विथ ओटीटी

आता जमाना आहे तो ओटीटीचा... म्हणजे ओव्हर द टॉप टेलिव्हिजन ही तंत्रप्रणाली. जगात आणि आपल्या देशातही या ओटीटी चँनल्सचं प्रमाण खूप आहे. ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉट स्टार, प्राईम व्हिडिओ यांसारख्या काही लोकप्रिय आणि उत्तम चॅनल्सचा या ठिकाणी उल्लेख करता येईल.

547

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील सध्याच्या आव्हानांवर लिहायचं ठरवलं आणि या आठवड्याची सुरुवात झाली तीच एका दुर्दैवी घटनेनं.  बॉलिवूडमधीलउमदा, चॅलेंजिंग अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांची आत्महत्या अत्यंत धक्कादायक. केवळ बॉलिवूडच नाही तर सारा देश या घटनेनं हादरला. यानिमित्तानं पुन्हा एकदा बॉलिवुडमधल्या जीवघेण्या स्पर्धेची आणि कट-कारस्थानांचीही चर्चा सुरू झाली आहे. हा विषय स्वतंत्रपणे लिहिण्याचा असलातरी एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे या क्षेत्रात सदैव आव्हानं आहेतच.

गेले दोन महिने तर या झगमगत्या इंडस्ट्रीचा डामडौल पुरता झाकोळला आहे तो कोरोनामुळे. या मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीमध्ये प्रामुख्यानेसमावेश होतो तो सिनेमा, टीव्ही, म्युझिक, ॲडव्हर्टायझिंग, स्पोर्ट्स , इंटरनेट रेडिओ, गेमिंग इत्यादींचा.  ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. काहीहजार कोटींची उलाढाल करणारी. सध्या ही उलाढाल ठप्प आहे. कारण लॉकडाऊनमुळे लाईव्ह  इव्हेंट्स, स्पोर्टस् इव्हेंटस् बंद आहेत. फिल्म रिलीज, टीव्ही शोज,  मालिका यांचं शेड्युल बिघडलंय. थिएटर्स बंद आहेत. प्रॉडक्शन थांबलंय. जाहिरातींचा ओघ कमी झाला आहे आणि प्रेक्षकसंख्याहीघटली आहे. भविष्यात सिंगल विंडो थिएटर तर सोडाच, मल्टिप्लेक्सनाही फार मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे; कारण या काळातलोकांच्या बदललेल्या सवयी. घरातल्या छोट्या पडद्यालासुद्धा लॅपटॉप, टैब आणि मोबाइल स्क्रीनचं भय आहे.

आता जमाना आहे तो ओटीटीचा… म्हणजे ओव्हर द टॉप टेलिव्हिजन ही तंत्रप्रणाली. जगात आणि आपल्या देशातही या ओटीटी चँनल्सचं प्रमाणखूप आहे. ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉट स्टार, प्राईम व्हिडिओ यांसारख्या काही लोकप्रिय आणि उत्तम चॅनल्सचा या ठिकाणी उल्लेख करता येईल.

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांनी ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य द्यायला सुरुवात केलीय आणि हे तंत्रही आत्मसात केलंय. एज्युकेशन, शॉपिंग, बँकिंग या क्षेत्रांत त्याबद्दलची प्रगती दिसू लागली आहे. त्यानंतरचा क्रमांक अर्थातच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा आहे. लोकांची हीमानसिकता आणि कोरोनाकोंडी लवकर न सुटण्याची शक्यता लक्षात घेऊन काही निर्मात्यांनी धाडसी निर्णय घ्यायला सुरुवातही केली आहे. यातमराठी निर्मातेही मागे नाहीत. विक्रम गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला “एबी अंँड सीडी” हा मराठी चित्रपट दोन महिन्यापूर्वीच प्राईम व्हिडिओवररिलीज झाला. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांच्या प्रमुख भूमिका असलेला शुजित सरकार यांचा “गुलाबो सिताबो”  प्राईम व्हिडिओवररिलीज झाला आहे. या दोघांचाही अनुभव नक्कीच चांगला असावा. याचं कारण असं की आता यापुढे अनेक बिग बॅनर्स आणि बिगशॉट कलाकारओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळणार आहेत, वळत आहेत.

“गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल”  हा धर्मा प्रॉडक्शनचा नवा चित्रपट नेटफ्लिक्सवर येतोय अशी खात्रीलायक बातमी आहे. एवढंच नाही तरअक्षयकुमारचा आगामी “लक्ष्मी बॉम्ब” हा हॉटस्टारवर येणार अशी घोषणाही झाली आहे. रोहित शेट्टीचा बिग बजेट “सूर्यवंशी”  हासुद्धा रिलीजचीवाट बघतोय.  मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिनसाठी तयार झालेला आणि अंदाजे दीडशे ते दोनशे कोटी कमाईची अपेक्षा असलेला सूर्यवंशी हाचित्रपट आहे. त्याला मात्र ओटीटीऐवजी परिस्थिती निवळण्याची, थिएटरची वाट बघण्याशिवाय गत्यंतरच नाही.

निर्माते दिग्दर्शक असे निर्णय घेत आहेत यामागे निश्चितच अर्थकारणही आहे. लॉकडाऊनपूर्वीच तयार झालेल्या काही चित्रपटांसाठी निर्मात्यांनी घाईकेली याचं कारण त्यांना अधिक नुकसान करून घ्यायचं नाहीये. ओटीटी रिलीजच्या माध्यमातून जितका गल्ला गोळा होईल तो स्वीकारण्याची त्यांचीतयारी आहे. अधिक लाभाचा मोह टाळायचा आणि अधिक नुकसान होऊ द्यायचं नाही अशी ही पॉलिसी आहे. ज्या एका चित्रपटाच्या निर्मितीला तीसकोटी रुपये खर्च आला त्याला नुकतेच ॲमेझॉनने 65 कोटी रुपये दिल्याचे कळते. हा सौदा वाईट नाही अशी आता अनेकांची भावना झाली आहे.

इकडे आता आठवडाभरापूर्वी मुंबईत चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी राज्य शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. रेड झोनमध्ये नसलेलेस्टुडिओज आणि शूटिंग साइट्स यासाठी पात्र असतील.  तिथे सँनिटायझेशन,  मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग हे सर्व सोपस्कारपार पाडावे लागणार आहेत. शिवाय अनावश्यक गर्दी टाळायची आहे. या अटी मान्य करणारे निर्मातेच प्रॉडक्शन , पोस्ट प्रॉडक्शन करू शकतात.  70 हिंदी मालिका, 40 मराठी मालिका, 10  डिजिटल मीडिया शोज यांनी यासाठी तयारी दर्शवली असून याद्वारे अंदाजे पाच हजार कोटीच्या बिझनेसलाप्रारंभ होईल अशी आशा आहे.

कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे कलावंत, निर्माते-दिग्दर्शक, संगीतकार, गायक यांना फार मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली आहे. सुमारे अडीचलाखांहून अधिक बॅकस्टेज कलाकारांवर तर  उपासमारीचं आणि बेरोजगारीचं संकट ओढवलंय. त्यांच्याबद्दलच्या सहानुभूतीच्या भावनेतून शासनाने हीसशर्त मान्यता दिली आहे. आता आव्हान आहे ते रिहर्सल्स आणि शूटिंगच्या दरम्यान नियम पाळण्याचं. अनेक सिन्स बदलावे लागणार आहेत. लेखक, कंटेंट रायटर सध्या त्यात व्यस्त आहेत. कारण बाल कलाकार आणि 65 च्या वरचे कलावंत यांना सेटवर यायला परवानगी नाही.  ही अडचण लक्षातघेऊन पुनर्लेखन हेही एक आव्हानच आहे.  मालिकांमधील घटना- प्रसंगांमध्ये  आता यापुढे कोरोना येणं हेही अपरिहार्यच ठरलं तर नवल नाही.

‘वुट’वर मालिकांचे एपिसोड कधीही बघू शकता हे ऑप्शन आता यापुढे कदाचित घातक ठरण्याची शक्यता आहे. सोय म्हणून पूर्वी रूढ झालेला हापर्याय मोठ्या प्रमाणात प्रेक्षक स्वीकारतील आणि छोट्या पडद्याकडे किंवा चॅनलकडे वळणार नाहीत हा तो धोका.  दुसरा धोका याहून गंभीर आहे. तोआहे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संदर्भातला. या प्लॅटफॉर्मला सेन्सॉर,  कन्टेन्ट फिल्टर नसल्याने न्यूडिटी, क्राईम्स यांच्यावर कुठलाच अंकुश नसेल. सरकारच्या कुठल्याही यंत्रणेचा यावर अंकुश नसतो त्यामुळे काय दाखवायचं याचं भान जर दाखवणाऱ्यांना नसेल तर काय बघायचं नाही याचं भानबघणाऱ्यांनाच ठेवावं लागेल.  जुलैच्या पहिल्या आठवड्यात छोटे पडदे नव्या निर्मितीसह झगमगू लागतील अशी आशा आहे. भारताबाहेर आयोजन  होण्याची चर्चा असलेल्या आयपीएल आणि इतर स्पोर्ट्स इव्हेंटकडेही या इंडस्ट्रीचे डोळे आहेत. कारण कॅमेऱ्याने नवनवी दृश्य टिपली तरीजाहिरातदारांनी हव्या त्या प्रमाणात जाहिराती दिल्या तरच ही इंडस्ट्री भविष्यात अपेक्षित 50 हजार कोटी रुपये उत्पन्नाचं लक्ष्य गाठू शकेल.

Previous articleBeyond The News & The Noise
Next articleसाधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजारात व्यवहारांना सुरुवात 
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.