अभिनेता श्रीकांत यादव यांनी दर्जेदार अभिनयाच्या जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. आता श्रीकांत यादवचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री मीरा जगन्नाथ दिसणार आहे. या दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे आणि त्यांचा धमाल लव्ह ट्रॅक पाहण्याची मजा प्रेक्षकांना मिळणार आहे.
चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार असून श्रीकांत यादव यांनी यात मिलिंद सुर्वे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. श्रीकांत सांगतात, “माझं पहिलं प्रेम अचानक समोर आल्यावर काय होणार, याची धमाल या चित्रपटात पाहायला मिळेल.”
मीरा जगन्नाथसोबत पहिल्यांदा काम केल्याचं सांगत श्रीकांत म्हणतात, “आमच्यात चांगली ट्युनिंग असल्यामुळे या भूमिका खूप एन्जॉय केल्या.”
‘इलू इलू’ चा दमदार स्टारकास्ट
चित्रपटात श्रीकांत आणि मीरा यांच्यासोबत एली आवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, आणि सिद्धेश लिंगायत यांसारखे कलाकार देखील झळकणार आहेत.
कथा आणि टीम
‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद नितीन विजय सुपेकर यांनी लिहिले आहेत.
चित्रपटाचे निर्माते आहेत बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके, तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.
चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी आणि संकलन नितेश राठोड यांनी केले आहे.
३१ जानेवारीला चित्रपटगृहात पाहायला विसरू नका – ‘इलू इलू’!