31.2 C
Pune
Saturday, May 18, 2024
- Advertisement -spot_img

विषय

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग ११

आकाशवाणीचा शेती विभाग आकाशवाणी 1927 सुरू झाली ती "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे ब्रीद अंगीकारून. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं हे माध्यम अल्पावधीत लोकशिक्षणाचं माध्यम बनलं. घरातल्या आणि समाजातल्या प्रत्येकाला हे माध्यम आपलं वाटावं यासाठी आकाशवाणीने सर्व वयोगटांसाठी आणि समाजातल्या सर्व घटकांसाठी कार्यक्रमांचं नियोजन केलं. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नवसमाजनिर्मितीचं स्वप्न साकारण्यासाठी...

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग १०

2003 साली नाशिकच्या तीन आणि त्र्यंबकेश्वरच्या तीन अशा सहा शाही पर्वणी आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या श्रोत्यांपर्यंतपोचवल्या. शाही पर्वणींचं हे असं थेट वर्णन आकाशवाणीला आणि श्रोत्यांनाही नवं होतं; परंतु निवेदक, समालोचक आणि तज्ञांचा यातला सहभागअजिबात नवखा नव्हता. पारंपरिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक  विपुल माहिती देत देत वर्तमानाशी सांगड घातली जात होती....

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग ९

२००३ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ठिकठिकाणांहून आलेल्या आकाशवाणी अधिकारी, अभियंते आणि निवेदकांची मोठी टीम तयार झाली. कार्यालय गजबजलं. कॉलनीत काही क्वार्टर्स रिकामे होते ते व्यवस्थित करून तिथे सर्व डेरेदाखल झाले. साधूंचे जसे वेगवेगळे आखाडे असतात तसेआकाशवाणी टीमचेही तीन आखाडे तयार झाल्याचे आम्ही गंमतीने म्हणू लागलो. आपल्याला नेमकं कुठं काम...

आकाशवाणीतील आठवणीतले दिवस: भाग ८

महिनाभरावर येऊन ठेपलेल्या 2003 च्या नाशिक कुंभमेळा तयारीला आता वेग आला होता. नाशिकची पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरचं कुशावर्त या दोन्हीठिकाणांहून आकाशवाणीसाठी धावतं समालोचन करता येईल अशा मोक्याच्या जागांचा शोध आम्ही घेत होतो. फार शोध घ्यावा लागला नाही. पंचवटीत रामकुंडावरच्या महापालिकेच्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरचा स्पॉट आम्ही निश्चित केला. तसं पत्र...

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस- भाग ७

कुंभमेळ्याचं आकाशवाणीवर राज्यस्तरीय कव्हरेज करायचं हा निर्णय झाला आणि तयारीला वेग आला. हातात जेमतेम सहा महिने होते. पूर्वतयारी दोन आघाड्यांवर समांतरपणे करायची होती. एक म्हणजे नाशिक केंद्रावरून विविध कार्यक्रम- उपक्रमांद्वारे वातावरण निर्मिती करणं आणि दुसरं म्हणजे नाशिक -त्र्यंबकेश्वरच्या प्रत्येकी तीन अशा एकूण सहा शाही पर्वण्यांच्या थेट प्रसारणासाठीचं मनुष्यबळ व्यवस्थापन,...

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस : भाग 6

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस ६ मध्ये जळगाव स्टेशन च्या कालावधीतले अनुभव कथन करतोय. सोलापूरचे माझे एक ज्येष्ठ सुह्रुद नारायणकाका कुलकर्णी मला नेहमी म्हणतात की, 'सुनील, तुम्ही सरकारी नोकरीत पेढे खाता.' त्यांच्या याम्हणण्याचा लक्ष्यार्थ असा की "आध्यात्मिक अनुभूतीचा अपरिमित आनंद तुम्हाला तुमच्या नोकरीच्या कामात सहज मिळतो. हे दुर्मिळ आणि दैवदुर्लभआहे."  मी क्षणभर विचार...

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस : भाग ५

रानकवी महानोरांशी ऋणानुबंध आकाशवाणीने मला भरभरून दान दिलंय. नेहमीच्या कार्यालयीन जबाबदारीच्या आनंददायी कामाव्यतिरिक्तचं हे दान म्हणजे कवितेच्या आणि कवींच्या ऋणानुबंधाचं मोत्यांचं दान. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेशी नातं कॉलेजमध्ये असतानाच जडलं होतं; पण त्यांच्याशी घट्टऋणानुबंध जुळला तो आकाशवाणीमुळे. हे घडलं जळगाव मुक्कामात. एका रिमझिमत्या श्रावणातलीच ही गोष्ट आहे. जळगाव मुक्कामातली....

पाडगावकर आणि विंदा : दोन विलक्षण अनुभव

औरंगाबादला विविध क्षेत्रांतील अनेक ख्यातनाम, मातबर मंडळींचं सतत येणं असायचं. शहरात काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या मंडळींनीआकाशवाणीत ध्वनिमुद्रणासाठी यावं असा आमचा आग्रह असायचा. एकदा कविवर्य मंगेश पाडगावकर आले होते. डॉ. सुधीर रसाळ सर आणिभगवान सवाई यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. मी ध्वनिमुद्रणाला होतो. मराठी कवितेतलं लखलखतं नक्षत्र डोळ्यांत साठवून घेतलं....

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग 3

लाड स्मृती व्याख्यानमाला पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमाला ही  आकाशवाणीची गौरवशाली परंपरा आहे. हा एक अखंड ज्ञानयज्ञच! गेली ६२ वर्षे ही व्याख्यानमाला सातत्यानं सुरू आहे. पुरुषोत्तम मंगेश लाड हे भारताच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचे पहिले सचिव होते. संत साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान हेत्यांच्या जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ...

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग २

30 सप्टेंबर 1993 पहाट मी कधीच विसरू शकणार नाही. या पहाटे लातूर जिल्ह्यात महाभयंकर भूकंपाने क्षणार्धात हजारो निष्पाप जीवांचे बळी घेतले. किल्लारी हे भूकंपाचं केंद्र होतं. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर, उमरगा आणि नजीकचा परिसरही हादरला होता. आदला दिवस अनंत चतुर्दशीचा होता. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमुळे गावं जागी होती. विघ्नहर्त्याला...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×