39.8 C
Pune
Monday, May 20, 2024
- Advertisement -spot_img

विषय

शब्दांच्या मागचे शब्द

शब्दांच्या मागचे शब्द -१३: खोगीरभरती

खोगीरभरती/ खोगीर लादणे खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवरील बैठक, आसन. आत चिंध्या वगैरे निरुपयोगी पण मऊ वस्तू भरून खोगीर केलेला असतो. त्यावरून वास्तविक उपयोग नसताना केवळ संख्या फुगविण्यासाठी घेतलेले (माणसे, वस्तू इत्यादी) असा अर्थ. कुचकामी, निरुपयोगी माणसांचा, वस्तूंचा भरणा. खोगीरभरती / खोगीर लादणे म्हणजे ताबा घेणे, वर्चस्व गाजवणे. (संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश...

शब्दांच्या मागचे शब्द – १२: उचलबांगडी करणे

उचलबांगडी करणे संस्कृत मध्ये उत् म्हणजे वर आणि चल् म्हणजे हलणे, जाणे, निघणे. उचलणे म्हणजे खालून वर येणे. उचलबांगडी या शब्दात बांगडी हा शब्द 'पांगडी' शब्दाचा अपभ्रंश आहे. पांगडी म्हणजे कोळ्यांचे मासे धरण्याचे जाळे. कोळी जाळे पसरून मासे आत आले म्हणजे ते उचलतो. हे जाळे मोठे असले म्हणजे ते दोघे चौघे...

शब्दांच्या मागचे शब्द – ११: बाष्कळ

बाष्कळ ‘तुझी बाष्कळ बडबड आता पुरे झाली!’ किंवा ‘हा बाष्कळपणा आम्ही किती काळ सहन करायचा?’ अशासारख्या वाक्यांमधून वापरला जाणारा ‘बाष्कळ’ हा शब्द ‘निरर्थक’ या अर्थाचा आहे. पण निरर्थकतेला बाष्कळपणा का म्हणायचे? ऋग्वेद हा ग्रंथ मुखोद्गत करीत असताना त्यात गुरुपरत्वे काही भेद होत होत ऋग्वेदाच्या काही शाखा निर्माण झाल्या. शाकल शाखा आणि...

शब्दांच्या मागचे शब्द- १० -मेख, भाऊगर्दी, अभीष्टचिंतन

शब्दांच्या मागचे शब्द हा एक  बहुआयामी विषय आहे. शब्दांचा अर्थ अनेक घटकांवर अवलंबून असतो आणि संदर्भानुसार बदलू शकतो. मागच्या सदरात आपण किमया या शब्दाचा अर्थ पाहिला होता.  आजच्या सदरात आपण पहाणार आहोत तीन वेगळ्या शब्दांचे बोधगम्य अर्थ किंवा समजण्यास सोपे अर्थ.मेख, भाऊगर्दी आणि अभिष्टचिंतन हे ते तीन शब्द. मेख मेख हा शब्द खुंटी...

शब्दांच्या मागचे शब्द -९ -किमया 

किमया छोट्या दोस्तांनो, तुम्हाला हेलन केलर माहितीच असेल. तिला डोळ्यांना दिसत नसे, कानांना ऐकू येत नसे आणि तोंडाने बोलताही येत नसे. एकूणच तिच्या भवितव्याबद्दल तिच्या आई-वडिलांना, शिक्षकांनाही आशा नव्हती. परंतु तिच्या आयुष्यात ऍनी सुलिव्हन ही शिक्षिका आली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. या शिक्षकेच्या मार्गदर्शनाखाली हेलनने लेखिका, शिक्षिका होऊन सगळ्यांना...

शब्दांच्या मागचे शब्द – ८- खटाटोप

खटाटोप खटाटोप या शब्दाची उगमकथा रंजक आहे. 'फटाटोप' या शब्दापासून पुढे 'खटाटोप' असा अपभ्रंश होऊन हा शब्द मराठीत आला असे सांगतात. मूळ संस्कृत श्लोक असा- निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महति फणा | विषमस्तु न चाप्यस्तु फटाटोपो भयंकर: || या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा की विष नसलेल्या सापाने सुद्धा (स्वसंरक्षणार्थ) विषारी सापाचे अनुकरण करावे कारण विष...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ७-आख्यान, व्याख्यान, उपाख्यान

आख्यान / व्याख्यान/ उपाख्यान आख्यान म्हणजे वर्णन, वृत्तान्त सांगणे, सूचित करणे. संस्कृत मध्ये पौराणिक कथा सांगताना आख्यान या शब्दाचा वापर होताना दिसतो. आख्यान म्हणजेच अशी पौराणिक कथा ज्यात कथा सांगणारा हा स्वतःच त्या कथेतील एक पात्र असतो किंवा कथा त्या व्यक्तीवर बेतलेली असते. "आख्यायते अनेनेति आख्यानम" म्हणजेच अशी कथा जी...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ६-आज, अजून, आणखी

आज, अजून, आणखी संस्कृतमधील अद्य हा मूळ शब्द. प्राकृतमध्ये याची अज्जु, अज्ज रूपे सिद्ध झाली.जुन्या मराठीत अजीहून, अजू, अजी अशी रूपे वापरलेली आढळतात. यावरून 'आज' हा शब्द आला. उदा. अजी मी ब्रह्म पाहिले, या रचनेत 'अजी' म्हणजे 'आज'. पुढे 'अज'ला ' इं' लागून त्याचा अपभ्रंश होऊन 'अजूइं' झाले आणि कालांतराने 'अजून' हे...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ५ – अध्वर्यु

अध्वर्यु भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिपर्वाचे अध्वर्यु अशी स्वा. सावरकरांची ओळख करून दिली जाते. इथे अध्वर्यु म्हणजे ‘प्रमुख’ असा अर्थ आपण समजून घेतो. हा शब्द यज्ञ-संस्थेतून भाषेत आलेला आहे. कोणत्याही यज्ञामध्ये चार प्रमुख ऋत्विज असतात. होता, अध्वर्यु, उद्गाता आणि ब्रह्मा. त्यांच्यापैकी यज्ञात देवतांना आहुती अर्पिण्याचे काम अध्वर्यूला करावयाचे असते. ‘होता’ हा...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ४-अतिपरिचयादवज्ञा, अथपासून इतिपर्यंत

अतिपरिचयादवज्ञा मूळ संस्कृत श्लोक असा- अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति | मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिन्धनम् कुरुते|| अर्थ: अतिपरिचय झाला म्हणजे अवज्ञा होते (दाट ओळखीच्या माणसाचा मानसन्मान कुणी ठेवत नाही), वारंवार जाणे येणे ठेवल्याने अनादर होतो. उदाहरणार्थ: मलय पर्वतात राहणाऱ्या भिल्ल स्त्रिया चंदनाचे लाकूड सरपण म्हणून जाळतात.  अथपासून इतिपर्यंत प्राचीन ग्रंथ किंवा संस्कृत स्तोत्रे पाहिल्यास त्यांचा आरंभ 'अथ' पासून होतो...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×