33.4 C
Pune
Saturday, May 18, 2024
- Advertisement -spot_img

विषय

मराठी

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ३-अजागळ आणि गलथान

अजागळ / गलथान "अजा" हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ बकरी. अजापुत्र म्हणजे बकरा किंवा बोकड. या प्राण्याला गळ्याशेजारी स्तनांसारख्या दोन मांसग्रंथी असतात परंतु, त्यातून दूध निघत नाही म्हणजे त्या निरुपयोगी ठरतात. त्यावरून "अजागलस्तन" हा शब्द रूढ झाला. याचेच रूप म्हणजे अजागळ. तसेच , 'गलथान' या शब्दात 'थान' म्हणजे 'स्तन'...

कोरोनाच्या काळात आहार कसा असावा ?

गेल्या तीन महिन्यांपासून टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअप मीडियाद्वारे कोरोनाव्हायरसची चर्चा आपण पहात व ऐकत आलो आहोत. कोविड-१९, साथीचा रोग सर्व देशभर तसेच जगभर पसरलेला असल्याने त्याला प्रतिसाद म्हणून सर्वच  नागरिकांना घरीच राहण्यास सांगितले आहे .ज्याप्रकारे या नवीन विषाणूने आपल्या दैनंदिन जीवनावर अवास्तव बदल घडवून आणला आहे, प्रत्येक नागरिकाने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग २ -अगत्य , अगतिक, अगम्य, गमक, गमावणे

अगत्य , अगतिक, अगम्य, गमक, गमावणे संस्कृतमध्ये 'ये गत्यर्थाः ते ज्ञानार्थाः' असा सिद्धांत आहे, म्हणजेच जेवढे 'गमनार्थक' धातू आहेत ते 'ज्ञानार्थक' समजावे. 'गमने' यात सतत गमनाची (जाणण्याची, वाटण्याची तसेच हलण्याची, जाण्याची) क्रिया आहे. सरस्वती जशी ज्ञानाची देवता आहे तशीच ती गमनाची द्योतक - नदीदेवता आहे ही कल्पना या सिद्धांताच्या मुळाशी...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग १-अखिल आणि निखिल   

अखिल आणि निखिल ‘अखिल मानव जातीला....’ किंवा ‘अखिल भारतात’ असे काही शब्दबंध आपण वापरीत असतो. खिल हा संस्कृत शब्द आहे. वेदामधल्या काही विशेष सूक्तांसाठी तो वापरला जातो. व्यासांनी ऋग्वेदाच्या दहा मंडाळांमध्ये सर्व सूक्तांची वाटणी केल्यावरही त्यांच्या लक्षात आले की, तरीही काही सूक्ते शिल्लक राहिलीच! मग त्या शिल्लक अथवा बाकी राहिलेल्या सूक्तांना...

शब्दांच्या मागचे शब्द: मनोगत 

मनोगत.मराठी  भाषेचा अभ्यास झाला पाहिजे, व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, भाषा जबाबदारीने हाताळायला हवी हे असं आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. मी सुद्धा असेच काहीसे कानउघाडणीपर बोल एका ज्येष्ठ व्यक्तीकडून ऐकले. त्यांचं कळकळीचं बोलणं ऐकताना फार जाणवत गेलं की आपलं शिक्षण जरी मराठी माध्यमातून झालेलं असलं आणि आपण थोडंफार...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग ३

खर म्हणजे कैलाशला शिक्षणात अज्जीबात रुची नव्हती, नववी नंतर त्याने दहावीची परीक्षा देऊन शिक्षणाला रामराम ठोकलेला पण कैलाश शिक्षणाचे महत्व जाणून होता, त्याने भलेही शिक्षण सोडले असेल पण आपल्या पाठच्या भावाने आणि बहिणीने शिकावे यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या इराद्याने तो सर्व प्रथम डेटा स्टार इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानात काम करत...

कोरोनाचा आयटी उद्योगावर होणारा परिणाम

चीनच्या वुहानमधून उद्भवलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसमुळे तीन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ८०००० पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. सर्वच उदयोगांना कमी अधिक प्रमाणात करोनाने ग्रासले आहे. त्यातच आयटी (माहिती तंत्रज्ञान उद्योग) येतो. हा उद्योग जागतिक असल्याने  ह्याचा परिणाम दीर्घ असणार आहे . येत्या आर्थिक वर्षात भारताच्या आयटी सेवा...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची- भाग २

संगणकाचा उदय होऊन काही वर्षे लोटली होती, इंटरनेटचे युग तेव्हा अवतरले नव्हते, हळूहळू संगणक जोडले जायला लागले होते, काही एकमेकाला जोडले जात होते तर काही बाकी उपकरणांना. पेनड्राईव्ह, सीडी, डीवीडी अशा अनेक उपकरणांवरून गेम्स, चित्रपट, डेटा संगणकावर उतरवला जाऊ लागला आणि या डेटा सोबत येऊ लागले संगणकातले किडे अर्थात...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग १

सध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन किती झालं याची तर सध्या स्पर्धाच चालू आहे. कोणी स्टार्टअप विकली ? कोणी घेतली ? का विकली ? का घेतली ? यावर चर्चांचा महापूर आला आहे. स्टार्टअप हा व्यवसायाचा असा प्रकार...

जनी वंद्य ते (भाग ९): मंगेश पाडगावकर

शब्दसामर्थ्याचा जादूगार : मंगेश पाडगावकर मराठी साहित्याच्या क्षेत्रात गेयता आणि आशयाचा सुंदर मिलाफ घडवून आणणारे कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. त्यांच्या कवितेतून प्रेम, वेदना, निसर्ग आणि सामाजिक वास्तवतेचे दर्शन होते. सोप्या शब्दांत गहिरी भावना व्यक्त करण्याची त्यांची ताकद अद्भुत आहे. त्यामुळेच ते आजच्या पिढीतील तरुणांच्याही तितक्याच पसंतीचे कवी आहेत. मंगेश पाडगावकर यांचे...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×