‘इलू इलू’ – पहिल्या प्रेमाच्या आठवणी जागवणारा मराठी चित्रपट

आठवणी या कधीच विसरल्या जात नाहीत, त्यांना मनातल्या एका खास कोपऱ्यात जपून ठेवावं लागतं. तारुण्यातल्या हळव्या भावना, पहिलं प्रेम, आणि मैत्री या सगळ्या गोष्टींचा अनुभव नव्याने येतो. ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट अशाच आठवणी जागवणारा आहे.

ट्रेलर लाँचचा खास अंदाज

‘इलू इलू’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. ९० च्या दशकाचा माहोल तयार करण्यात आला होता, आणि विंटेज कारमधून कलाकारांनी ग्रँड एंट्री केली. दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भावविश्वाशी नाते जोडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

 

एली आवरामचं मराठी पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री एली आवराम ‘इलू इलू’ चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिने ‘मिस पिंटो’ ही व्यक्तिरेखा साकारली असून, त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एलीसोबत मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, आरोह वेलणकर यांसारखे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

चित्रपटाच्या कथा-वस्तुशिल्पाबद्दल

इलू इलू’ ची कथा, पटकथा, आणि संवाद नितीन विजय सुपेकर यांनी लिहिले आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके व हिंदवी फाळके असून, सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.

हा चित्रपट तुमच्या पहिल्या प्रेमाच्या गोड आठवणींना नव्याने उजाळा देईल, असं नक्कीच वाटतं.

अथर्व चिवटे
अथर्व चिवटे
अथर्व चिवटे हे न्यूजइंटरप्रिटेशनच्या युट्युब चॅनेलचे दिग्दर्शक आहेत.  दिग्दर्शकाच्या जबाबदाऱ्यां व्यतिरिक्त, अथर्व  एक चित्रपटप्रेमी आणि लेखक देखील आहे.ते  नियमितपणे आगामी चित्रपटांच्या समीक्षणांवर लेखन करतात. उद्योगातील ट्रेंडचे विश्लेषण करणे, आकर्षक कथा तयार करणे आणि विविध प्लॅटफॉर्मवर कथा प्रभावीपणे पोहोचावं  हेअथर्वचे  कौशल्य आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!