आजचं जग हे टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञानाच्या विळख्यात आहे. हल्ली कुठलीही गोष्ट करायची असेल तर तंत्रज्ञानाची मदत लागते. कुठं जायच असेल तर गाडी घेऊन लगेच जाता येतं. कोणाशी बोलायचं असेल तर मोबाइल वरून बोलता येतं. इतकंच काय तर हल्ली सातासमुद्रापार असलेल्या लोकांशी सुद्धा फेसबुक आणि ट्विटर वरून संपर्क साधता येतो. लोकांचा वेळ वाचावा म्हणून संगणक म्हणजे कॉम्प्युटरची निर्मिती झाली. जे काम मानवी बुद्धीला किंवा शरीराला शक्य नाही किंवा खूप कठीण आहे ते काम हा संगणक झटक्यात करू शकतो. जसा काळ पुढे गेला तसे बदल या संगणकात घडले आणि आज विविध क्षेत्रात विविध पद्धतीने संगणक वापरला जातो.
रेगटेक म्हणजे काय ?
- स्वस्त अनुपालन प्रक्रिया
- मनी लॉंडरींगचा सामना करणे शक्य
- नियामक अहवालाशी (रेग्युलेटरी रिपोर्ट) निगडित दंड टाळणे
- कार्यक्षम अनुपालन व्यवस्थापन
- कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये सुधारणा
- व्यवहारात पारदर्शकता
- माहितीच्या टुणवत्तेत सुधारणा
रेगटेक कंपन्या तंत्रज्ञान आणून वित्तीय क्षेत्रातील कमतरता भरुन काढण्यास समर्थ आहेत. त्याद्वारे नियामक आव्हानांचा सामना करण्यासाठी वित्तीय संस्थांना अतिरिक्त बळ मिळते. याव्यतिरिक्त, मोठ्या वित्तीय संस्थांवर लादलेल्या दंडांची वाढती संख्या तसेच नामांकित संस्थांमध्ये मनी लाँडरिंग आणि फसवणूकीच्या घटनांसह नियामक संस्था संपूर्ण उद्योगविश्वाचे बारकाईने निरीक्षण करीत आहेत व कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अहवाल मानक (रिपोर्टींग स्टॅंडर्ड) आणि त्यातील पारदर्शकता ही संथांसाठी पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण झाली आहे. आर्थिक संस्था या विशेषत: वाढत्या कायद्याच्या अनुपालना मुळे आज रडार वर आहेत आणि हे गैर-अनुपालनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी या प्रक्रिया संगणकीकृत (डिजिटल) करण्याच्या मागे आहेत. हे सांगगणकीकरण (डिजिटाईझेशन) करण्याचं काम रेगटेक कंपन्या करतात.