जेनेसिसच्या दिवाळखोरीमुळे कर्जदारांना मिळणार मूळ रकमेच्या ७७% रक्कम

जेनेसिसने नुकत्याच केलेल्या फाइलिंगनुसार, दिवाळखोरीत निघालेल्या जेनेसिसने रोख रक्कम आणि क्रिप्टोच्या स्वरूपात सुमारे ३०० कोटी डॉलर एवढी रक्कम त्यांच्या देणेकदारांना वाटप करण्याची योजना मान्य करून घेतली आहे. ही रक्कम ग्राहकांच्या एकूण दाव्यांच्या मूल्याच्या सुमारे ७७% आहे. मात्र, डिजिटल करन्सी ग्रुपला या यादीमध्ये समाविष्ट केले जाणार नाही.

जेनेसिस ग्लोबल होल्डको एलएलसी, जेनेसिसची होल्डिंग कंपनी आणि त्यांच्या उपकंपन्यांनी जानेवारी २०२३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये चॅप्टर ११ अंतर्गत दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केला होता. थ्री एरोज कॅपिटल आणिएफटीएक्सच्या दिवाळखोरीमुळे  झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे त्यांच्यावर ३५० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम पहिल्या ५० देणेकर्यात देय आहे.

फाइलिंग केल्यानंतर थोड्याच वेळात बाजारपेठेत अशी शंका होती की ग्राहकांना पूर्ण रक्कम परत मिळणार नाही आणि दिवाळखोरीची कार्यवाही जलद मार्गाने पूर्ण होणार नाही. जानेवारी २०३ मध्ये Xclaim ने प्रथम जेनेसिसच्या दाव्यांची किंमत त्यांच्या मूल्याच्या मात्र ३५% इतकी दर्शविली.

डिजिटल करन्सी ग्रुप (DCG), जेनेसिसची मूळ कंपनी, या कार्यवाहीमध्ये कोणतेही पेआउट प्राप्त करणार नाही.

“येथील रेकॉर्ड स्पष्टपणे स्थापित करतो की कर्जदारांच्या मालमत्तेत कर्जदारांना पेमेंट केल्यानंतर DCG ला इक्विटी धारक म्हणून परतफेड करण्यासाठी पुरेसे मूल्य नाही,” असे जज सीन लेन यांनी फायलींगमध्ये लिहिले आहे. “कर्जदारांच्या दाव्यांचे प्रमाण पाहता, DCG इक्विटी धारक म्हणून अब्ज डॉलर्सच्या बाहेर आहे, अगोवा कोर्ट कर्जदाराच्या दाव्यांचे मूल्य DCG प्रस्तावित करते त्या पद्धतीचा वापर करून देखील मूल्यांकन केले तरीही त्यांना काहीही देणे चुकते करता येणार नाही .”

TOP 10 TRENDING ON NEWSINTERPRETATION

FAQs About Newsinterpretation

Who owns NewsInterpretation? NewsInterpretation is owned and operated by Mohit...

FAQs About Newsinterpretation

Who owns NewsInterpretation? NewsInterpretation is owned and operated by Mohit...

Related Articles

Popular Categories