‘ मितवा ’ची दशकपूर्ती: मराठी चित्रपटसृष्टीतला टर्निंग पॉईंट

मराठी चित्रपटसृष्टीत 2015 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला – तो म्हणजे “मितवा”! या चित्रपटाने केवळ त्या काळातील प्रेक्षकांना भुरळ घातली नाही, तर आजही चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान राखले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता ठरला.

मितवा: प्रेमाची अनोखी कहाणी

स्वप्नील जोशीने त्याच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या. परंतु, त्याच्या रोमँटिक भूमिकांमध्ये मितवाचे नाव आवर्जून घेतले जाते. स्वप्नीलची लव्हस्टोरी हिरोची प्रतिमा आधीच ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ यांसारख्या चित्रपटांमधून बहरली होती. मात्र, या चित्रपटामध्ये त्याने ती इमेज अधिक गडद आणि प्रभावी केली.

या चित्रपटातील त्याची भूमिका तरुण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरणारी ठरली. त्याचे अभिनय कौशल्य, इमोशनल आणि रोमँटिक सीनमधील सहजता यामुळे “मितवा” चित्रपटगृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. विशेषतः, चित्रपटाच्या संगीतमय प्रवासाला देखील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली.

‘ मितवा ’ची दशकपूर्ती: मराठी चित्रपटसृष्टीतला टर्निंग पॉईंट

स्वप्नीलच्या आठवणीतील मितवा

या दशकपूर्तीनिमित्त, स्वप्नील जोशी आपल्या आठवणींना उजाळा देताना म्हणतो –

“मितवा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा, त्याचे टायटल आणि त्यामधील वेगळेपण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले. विशेषतः शंकर-एहसान-लॉय यांच्या संगीताने हा चित्रपट आणखी समृद्ध केला. या चित्रपटामुळे सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरेसारख्या गुणी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मितवा हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक हटके लव्हस्टोरी चित्रपट ठरला.”

या चित्रपटाच्या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी शक्य झाल्या. मराठी चित्रपटात हेलिकॉप्टरमधून उतरणारा नायक, दमदार लव्ह साँग्स, अप्रतिम सिनेमॅटोग्राफी या गोष्टी सामान्यत: दिसत नव्हत्या. मात्र, “मितवा” ने त्या सर्व गोष्टींना सुरेखपणे साकारले.

चित्रपटाच्या शेवटाबद्दल स्वप्नील पुढे सांगतो –

“आजही अनेक फॅन्स भेटले की, ते मला चित्रपटाच्या शेवटाबद्दल बोलतात आणि कौतुकाने सांगतात की, मराठी चित्रपटसृष्टीत असा शेवट त्यांनी पाहिला नव्हता. प्रेक्षकांचे हे प्रेमच मितवाच्या यशाचे खरे गमक आहे, आणि मी त्याचा सदैव ऋणी राहील.”

‘ मितवा ’ची दशकपूर्ती: मराठी चित्रपटसृष्टीतला टर्निंग पॉईंट

दहा वर्षांनंतरही हा चित्रपट तितकाच खास!

आज या चित्रपटाच्या च्या प्रदर्शनाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, पण हा चित्रपट आजही तितकाच एव्हरग्रीन वाटतो. यातील गाणी, कथा आणि स्वप्नीलच्या अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.

स्वप्नील जोशीचा “मितवा” चित्रपट हा मराठी सिनेसृष्टीत कायम स्मरणात राहणारा चित्रपट ठरला असून, या दशकपूर्तीनिमित्त त्याच्या यशाचा गौरव करण्यासाठी चाहते पुन्हा एकदा या सिनेमाच्या आठवणीत रमले आहेत!

अथर्व चिवटे
अथर्व चिवटे
अथर्व चिवटे हे न्यूजइंटरप्रिटेशनच्या युट्युब चॅनेलचे दिग्दर्शक आहेत.  दिग्दर्शकाच्या जबाबदाऱ्यां व्यतिरिक्त, अथर्व  एक चित्रपटप्रेमी आणि लेखक देखील आहे.ते  नियमितपणे आगामी चित्रपटांच्या समीक्षणांवर लेखन करतात. उद्योगातील ट्रेंडचे विश्लेषण करणे, आकर्षक कथा तयार करणे आणि विविध प्लॅटफॉर्मवर कथा प्रभावीपणे पोहोचावं  हेअथर्वचे  कौशल्य आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!