सदा सर्वदा स्टार्टअप : भांडवल उभारणीची प्रक्रिया

विविध मार्केट प्लेयर्स ते कसे आणि कोणत्या टप्प्यावर सहभागी होतील यावर जोर देत आहेत. तर व्हीसी आणि पीई फर्ममधील फरक काय आहेत? या प्रकारात आणखी भांडवल कोण देत आहे?

0
801

भांडवल उभारणी ही एक सततची प्रक्रिया आहे, स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पना आणि नवीन कल्पना मोठी करायला लागते ते भरपूर भांडवल. मागील लेखात आपण बूट स्ट्रॅप आणि सीरिज ए या राऊंडबद्दल वाचले. आता या लेखात आपण पुढील सिरीजचा आढावा घेणार आहोत.

सिरीज बी राऊंड

केवळ ५० टक्केच स्टार्टअप या राऊंडपर्यंत पोहोचतात. ज्या स्टार्टअपचे उत्पादन किंवा सेवा हळूहळू परिपक्व होत जातात, विक्री वाढत जाते आणि आधीच्या राऊंडमध्ये उभ्या केलेल्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला गुंतवणूकदारांना मिळालेला असतो त्याच स्टार्टअप या राऊंडमध्ये यशस्वी भांडवल उभारणी करू शकतात.

सिरीज सी राऊंड

सिरीज सी व्यवसायाच्या स्केलिंग म्हणजेच व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर वाढवण्यासाठी आहे. या टप्प्यातील गुंतवणूकदार सर्वात मोठय़ा उद्यम भांडवल निधी (व्हेंचर कॅपिटल फंड), प्रायव्हेट  इक्विटी कंपन्या आणि कॉर्पोरेशन्स असतील. आतापर्यंत भेटलेल्या गुंतवणूकदारांमधले सर्वात जास्त आव्हानात्मक गुंतवणूकदार या टप्प्यात भेटतात.

विलीनीकरण अधिग्रहण आणि नोंदणी 

तुमच्या स्टार्टअपसाठी पुढील प्रमुख तरलतेचे (लिक्विडिटीचे) प्रसंग म्हणजे मर्जर अ‍ॅण्ड अ‍ॅक्विझिशन डील होणे किंवा कंपनी भांडवल बाजारात नोंदणीकृत होणे. या टप्प्यानंतर लवकरच बरेच संस्थापक त्यांच्या स्टार्टअपचा अखेरचा निरोप घेतात.

प्रारंभ निधी संकलन (स्टार्टअप फंड रेझिंग)

जेव्हा तुम्ही कुठलीही स्टार्टअप आयडिया विकसित करताय किंवा तुमच्याकडे डेटा आहे, उत्पन्न सुरू झालंय किंवा आता कंपनीचं कामकाज वाढवायचं आहे, तेव्हा कुठले गुंतवणूकदार आहेत जे तुम्हाला पुढच्या स्तरावर घेऊन जातील हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कंपनीचा पुढचा टप्पा काय, निर्गमन धोरण (एक्झिट स्ट्रॅटेजी) काय आहे याचा विचार आवश्यक आहे.

प्रायव्हेट इक्विटी (पीई)

पीई स्पेस थोडीशी गर्दीची झाली आहे, कारण खासगी इक्विटी कंपन्या, सर्व प्रकारच्या नवीन चॅनेलमध्ये म्हणजेच ‘भाडय़ाने देण्यात येणारी घरे’ या वेबसाइट्सपासून ते चॅनेल पद्धतीने देण्यात येणारे गहाणखत कर्ज (मॉर्ट्गेज लेंडिंग) यामध्ये प्रवेश करतायेत.