30.6 C
Pune
Monday, April 29, 2024

सिंग बंधूंचे घोटाळे, राजकारण आणि रॅनबॅक्सीची रंजक कथा

Must read

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

दोन असे भाऊ जे एकमेकांमध्ये भांडण्यात इतके गुंतले आहेत कि त्यांना त्यामुळे चौकशी आणि विविध आरोपांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यांनीच उभे केलेले एक व्यवसायिक साम्राज्य धुळीस मिळते. ही गोष्ट आहे मनविंदर आणि शिविंदर या बंधुद्वयी आणि त्यांच्या रॅनबॅक्सी या जगविख्यात ब्रँडची.
ताज्या घटनेत रिलिगेअर फिनव्हेस्ट ही रिलिगेअरची सहाय्यक कंपनी असून, त्यांनी प्रवर्तक मालविंदर मोहन सिंग आणि शिविंदर मोहन सिंग यांच्याविरूद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि घोटाळा करून 740 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. काही दशकात आपला व्यवसाय नावारूपास आणून मोठ्या झालेल्या व्यावसायिक घराण्यासाठी ही खेदाची बाब आहे.
व्यवसायाची सुरुवात
फाळणीनंतर व्यापारी भाई मोहन सिंग हे पाकिस्तानमधील रावळपिंडी येथून दिल्लीला आले. त्याने चुलतभाऊ रणजितसिंग आणि गुरबक्षसिंग यांच्याकडून कर्जबाजारी असलेली एक कंपनी खरेदी केली, ज्यांची पहिली नावे त्यांच्या कंपनीच्या नावावर एकत्रित झाली – रॅनबॅक्सी. अनेक दशकांनंतर ही भारतातील सर्वात मोठी औषध कंपनी बनली. मालविंदर मोहन सिंग आणि शिविंदर मोहन सिंग या बंधूंचे वडील परविंदरसिंग यांनी त्यांच्या वडिलांकडून कंपनीवर नियंत्रण मिळवले. नंतर वारसा मिळालेली कंपनी सिंग बंधूंनी यांनी विकली.
कर्तबगार मुले
सिंग बंधूंचे शिक्षण दिल्लीतील नामांकित डून स्कूल, प्रतिष्ठित सेंट स्टीफन कॉलेज आणि नंतर अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीच्या फुकवा स्कूल ऑफ बिझनेसमधून झाले होते. सिंग बंधूचे गोड, शिष्ट स्वभाव बरोबरीला उच्च शिक्षण त्यामुळे ते यशस्वी जाणकार व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. १९९९ मध्ये त्यांचे वडील परविंदर सिंग यांच्या निधनानंतर त्यांना रॅनबॅक्सीमध्ये ३३.५ % हिस्सा मिळाला. त्यांनी रॅनबॅक्सीतील हिस्सा उच्चतम किमतीला विकला आणि माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. २००८ मध्ये त्यांनी जपानी ड्रूग निर्माता दाईईची सँक्यो यांना ही कंपनी $४.६ अब्ज डॉलर्समध्ये विकली, त्यातील २.4 अब्ज डॉलर्स त्यांना मिळाले. एवढी मोठी रक्कम त्यांच्या महत्वाकांक्षेला चालना देणारी होती आणि त्यांनी फोर्टिस हेल्थकेअर आणि रेलीगेअरच्या विस्तारासाठी पैसे गुंतविले. काही वर्षांतच त्यांनी फोर्टिस हेल्थकेअरला देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल चेन आणि रेलीगेअर एंटरप्राइजेसला सर्वात मोठी एनबीएफसी बनविले.
आणि घोटाळा उघड झाला
दोन जाणकार व मेहनती तरुणांच्या नेतृत्वात असलेले व्यवसाय साम्राज्य उलगडण्यास सुरवात झाली जेव्हा आर्थिक गैरवर्तन केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. रॅनबॅक्सी विक्रीतून मिळालेल्या रकमेचा मोठा भाग अनेक कौटुंबीक-मालकीच्या कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आला. या सगळ्या पैशाभोवती सध्याचे आरोप फिरत आहेत त्यातही मुख्यत्वे हे पैसे राधा स्वामी सत्संग बियास या अध्यात्मिक पंथाला, ज्याचे नेतृत्व त्यांचेच नातेवाईक करत आहेत, दिले गेले आहेत. सिंग बंधूंवर फोर्टिस या सूचिबद्ध असलेल्या कंपनीत 500 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. चौकशी आणि अफराच्या आरोपांमुळे त्यांना फोर्टिस आणि रेलीगेअरवरील नियंत्रण सोडावे लागले. सिंग बंधूना सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिससह अनेक सरकारी एजन्सीजच्या चौकशीचा सामना करावा लागत आहे. लुथ्रा अँड लूथ्रा या कायदेविषयक सल्लागार संस्थेने केलेल्या अंतर्गत तपासणीनंतर निधीची अफरातफर झाल्याचे समजल्यानंतर सरकारी संस्थांनी सिंग बंधूंच्या भूमिकेची चौकशी सुरू केली.
दाईईची प्रकरण
हे प्रकरण मोठे होण्यामागे फक्त रॅनबॅक्सी विकल्यामुळे फक्त भरघोस पैसा मिळाला हे नव्हे तर विक्रीनंतर उजेडात आलेलय काही बाबी कारणीभूत होत्या. सिंग बंधू रॅनबॅक्सी विकत असताना कंपनीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन आणि न्याय विभागाच्या चौकशीचा सामना करावा लागला होता. नवीन औषधांच्या चाचणी निकालांमध्ये (नवीन औषधांचे प्रलंबित आणि मंजूर अर्ज) डेटा आणि चाचणी निकाल खोटे दिल्याचा आरोप होता. नंतर, यूएसएफडीएने रॅनबॅक्सीच्या दोन डझनहून अधिक  औषधांवर बंदी घातली. सेटलमेंटचा भाग म्हणून रॅनबॅक्सीला ५०० दशलक्ष डॉलरचा दंड आणि अमेरिकन संस्थांना औषधांवरील बंदीला हटवण्यासाठी भरपाई द्यावी लागली. दाईईची ने रॅनबॅक्सी विकताना यूएसएफडीएच्या चौकशीबाबत माहिती लपवल्याचा आरोप केला आणि सिंगापुर न्यायालयात त्याबद्दल त्यांना ५५० दशलक्ष डॉलर ची भरपाई देण्याचा निकाल देखील लागला. हा निकाल पुढे दिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवला. फोर्टिस आणि रेलीगेअर येथे केलेली आर्थिक अफ़रातफ़र उघड होण्याआधीच दाईईची प्रकरणामुळे सिंग बंधूंच्या प्रतिष्ठेवर मोठा डाग लागला होता.
भाऊ विरुद्ध भाऊ
आर्थिक अफ़रातफरीच्या आरोपानंतर सिंग बंधूंचे नातेसंबंध दबावात आले आणि यामुळे त्यांनी एकमेकांवर विविध आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली. सप्टेंबरमध्ये शिविंदर यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कडे दाखल केलेल्या याचिकेत मोठा भाऊ मालविंदर आणि सुनील गोधवानी यांच्याविरूद्ध गंभीर आरोप केले. रिलिगेअरचे माजी प्रमुख मालविंदर आणि गोधवानी यांनी रेलीगेअरची संपूर्ण मालकीची कंपनी असलेल्या रिलीगेअर फिनवेस्ट लिमिटेडकडून ७५० कोटी रुपये आणि फोर्टिस हेल्थकेअरकडून ४७३ कोटी रुपये असे एकूण १२२३ कोटी रुपये आरएचसी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या सिंग बंधूंच्या ताब्यातील कंपनीमध्ये वाळवल्याचा आरोप शिविंदर यांनी केला. शिविंदर यांनी त्यांची पत्नी अदिती सिंग यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आरएचसीच्या कागदपत्रांमध्ये मालविंदर सिंग यांनीच केल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.
२०१५ मध्ये राधा सोमी सत्संग बियास या आध्यात्मिक पंथात पूर्ण वेळ असताना इकडे कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिविंदर यांनी केला. “मी २०१५ मध्ये व्यवसायातून निवृत्त होऊन माझ्या अध्यात्मिक गुरूंच्या / स्वामींच्या सेवेसाठी, बियास येथे गेलो तेव्हा व्यवसायात भरभराटीला आलेली कंपनी मी “विश्वासू” हातात दिली आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत बिघडली आणि एक देशभरात मोठी आरोग्यसेवा देणारी संस्था नष्ट होण्याच्या दिशेने गेली आहे”.
नंतर, शिविंदर यांनी त्यांच्या आजारी आईने मध्यस्थी करून सर्व गोष्टी मिटवण्यास सहमती दर्शविली आणि कोर्टातील याचिका मागे घेतली. तथापि, ते म्हणाले, “जर मध्यस्थी अपयशी ठरली, तर सर्व मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि नव्याने सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कार्यवाही करण्याचा माझा विचार आहे.”
भाऊ मारहाण करण्यासाठी येतात?
मोठा भाऊ मालविंदरने शिविंदरवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप अलीकडेच झाला होता. मालविंदरने एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या भावाने आपल्याला मारहाण करून जखमी केले आणि धमकावल्याचा आरोप केला आहे. एका उच्च शिक्षित आणि मधुर स्वभाव असलेल्या बंधुद्ववयींचें हे असे उलट वागणे हि खेदजनक गोष्ट होती. मालविंदरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मध्यस्थी अयशस्वी झाल्याचे दर्शविले गेले. मालविंदर यांनी केलेल्या शारिरीक हल्ल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिविंदर म्हणाले की, व्यवसायिक समूहाच्या अध्यक्षांनी अशा लाजीरवाण्या युक्तीचा अवलंब केल्याचे पाहून मला दुःख झाले आहे आणि धक्का बसला आहे. नंतर ते म्हणाले की, मालविंदर यांच्याशी मैत्रीपूर्ण विभक्तीसाठी १००० कोटी रुपयांची मागणी झाल्यानंतर आपण वाटाघाटीची प्रक्रिया बंद केली आहे.
सिंग बंधुद्वयिंनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांमधून अथवा त्यांच्यावर उगारलेल्या कायदेशीर कारवाईच्या बडग्यातून लवकर बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यांच्या पाठीमागे त्यांना एक मोठा होऊ घातलेला व्यवसाय समूह फक्त काही वर्षातच जमीनदोस्त होत असताना बघायला लागतो आहे.

More articles

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!
×