एफटीएक्सच्या देणेक-यांना २.६ अब्ज डॅालर्स मिळायची शक्यता

एफटीएक्सची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याची जबाबदारी असलेल्या एस्टेटने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात  उपलब्ध असलेले सोलाना SOL टोकन टेरा कॅपिटल आणि फिगर मार्केट्स यांना लिलावात विकले आहेत.

एफटीक्स हे दिवाळखोर एक्सचेंज आहे त्यांची मालमत्ता जप्त करण्याची जबाबदारी एस्टेट या कंपनीकडे आहे. शेवटी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेले सोलाना टोकन, विकून आताच्या किंमतीला २.६ अब्ज डॅालर मिळवून देणार आहे. आता बंद पडलेल्या एक्सचेंजच्या देणेक-यांना आणि माजी ग्राहकांना भरपाई देण्याच्या प्रयत्नांमध्ये पॅन्टेरा कॅपिटल आणि फिगर मार्केट्स यांनी हे टोकन विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. FTX ने हे SOL टोकन $102 प्रति टोकन दराने विकले आहेत – जे सध्याच्या $168 च्या SOL च्या मार्केट किमतीच्या तुलने खूप कमी आहे.

लिलावाच्या माध्यमातून फिगर मार्केट्सने 800,000 SOL टोकन्स खरेदी केले आहेत, तर बाकीचे सर्व टोकन पॅन्टेरा कॅपिटलने विकत घेतले आहेत.

आभासी चलन आणि पारंपारिक चलन यांच्यातील फरक

एफटीएक्सच्या कंगाल मालमत्तेच्या एस्टेटने $7.3 अब्ज मालमत्ता जप्त केली असली तरी, सर्वजण एस्टेटच्या पुनर्प्राप्ती प्रयत्नांबद्दल समाधानी नाहीत.

एफटीएक्सच्या देणेक-यांच्या समुदायाचे प्रमुख असणा-या सुनील कवूरी यांनी मालमत्तेची विक्री अत्यंत कमी किंमतीत केल्याबद्दल एफटीएक्सच्या कंगाल मालमत्तेच्या एस्टेटवर आक्षेप घेतला आहे. कवूरी म्हणाले, यांनी आमच्या मालमत्ता हक्कांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी अब्ज डॉलरच्या डिजिटल मालमत्तांची विक्री केली आहे. एका टोकनची विक्री 11 सेंट मध्ये करण्यात आली आणि आता त्याची किंमत दोन डॉलर आहे. एफटीएक्सकडे 10 अब्ज डॉलरच्या रकमेचे सोलाना टोकन होते – ते 70% डिस्काउंटला विकले गेले.”

कवूरी पुढे म्हणाले की, ही डिजिटल मालमत्ता म्हणजे माजी प्लॅटफॉर्मच्या द्णेक-यांची आणि ग्राहकांची मालमत्ता आहे आणि त्यांनी एफटीएक्सच्या कंगाल मालमत्तेच्या वकिलांवर, मालमत्ता अत्यंत कमी किंमतीत विकल्याबद्दल टीका केली. त्यांच्या मते, ही मालमत्ता थेट पैसे गुंतवलेल्यांना परत करायला हवी होती.

- Advertisment -

वाचनीय असे काही

error: Content is protected !!