fbpx

कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ?

तस बघायला गेलं तर शेअर बाजारात कोणी विचारलेल्या कोणता शेअर घ्यावा, त्यामध्ये किती कालावधी साठी गुंतवणूक करावी या प्रश्नांची उत्तर कोणीच अचूक देऊ शकत नाही. परंतु कॅण्डल स्टिक च्या अभ्यासाने हि उत्तर देणे काही प्रमाणावर शक्य आहेत. कॅण्डल स्टिकच्या अभ्यास टेकनिकल अनॅलिसिस प्रकारात मोडला जातो. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये शेअर्सच्या किंमतीचा आणि किमतीत होणाऱ्या चढ-उतारांचा आणि शेअर्समध्ये होणाऱ्या खरेदी-विक्रीच्या प्रमाणाचा  संख्यात्मक व तुलनात्मक अभ्यास केला जातो. संख्यात्मक म्हणजे उपलब्ध आकडेवारीचा तर तुलनात्मक म्हणजे आत्ता घडलेल्या घडामोडींचा आणि यापूर्वी घडलेल्या घडामोडींच्या उपलब्ध नोंदी यांचा अभ्यास करणे होय.

कॅन्डलस्टिक हि कोणत्याही शेअरच्या किमतीची हालचाल किंवा मोव्हमेन्ट दाखवण्याची पद्धत आहे. भारतीय शेअर बाजारातील शेअरच्या मागणी आणि पुरवठ्यावर शेअरची किंमत वर खाली होत असते. या वर खाली होण्याऱ्या किमतीचा आलेख म्हणजेच कॅन्डलस्टिक चार्ट. या आलेखावरून आपण शेअरच्या पुढील किमतीचा  अंदाज लावू शकतो.

कॅण्डलस्टीक्सचा शोध १८व्या शतकात जपान देशात लागला. त्याच्या वापराची सुरुवात सर्वप्रथम जपानमध्ये ‘सकाता’ या शेअर बाजारात झाली. त्याच्या शोध  जपानमधील तांदळाचे व्यापारी मूनहीसा होनमा यांनी लावला. ‘स्टीव्ह निसान’ यांनी ‘जपानीझ कॅण्डलस्टीक्स चार्ट टेकनिक्स’ या पुस्तकातून जपानी

कॅन्डलस्टिकची माहिती जगभर प्रसिद्ध केली आणि आता हि पद्धत टेकनिकल ॲनालिसिससाठी जगभरात सर्वत्र वापरली जाते.

या कॅण्डलस्टीक्स १ मिनिट इतक्या कमी तर ते १ वर्ष इतक्या मोठ्या कालावधीसाठी देखील बनतात. कॅण्डलस्टीक्स बघण्याचा कालावधी हा आपल्या ट्रेडिंग पद्धतीस पूरक असावा लागतो.

इंट्राडे ट्रेडर्स कमी वेळेच्या टाईमफ्रेम जसे कि १मि, ३मि ,५मि १५मि आणि १ दिवस वापरतात

स्विंग ट्रेडर्स मध्यम वेळेच्या टाईमफ्रेम जसे कि १५मि, ३०मि ,१तास १ दिवस  आणि १ सप्ताह वापरतात

लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांकडून मोठ्या टाईमफ्रेमला पसंती दिली जाते जसे कि १ दिवस , १ आठवडा किंवा १ महिन्याच्या चार्टला पसंती मिळते.

कॅन्डलस्टिक आपल्याला पुढील गोष्टी दर्शवतात

१. ओपन प्राईस

शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची अगदी सुरवातीची किंमत म्हणजे ओपन प्राईस होय.

२. क्लोझ प्राईस

शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची अगदी शेवटची किंमत म्हणजे क्लोझ प्राईस होय.

३. हाई प्राईस

शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची कमाल किंवा सर्वाधिक किंमत म्हणजे हाई प्राईस होय.

४. लोव प्राईस

शेअरची ठरलेल्या कालावधीसाठीची किमान किंवा सर्वात कमी किंमत म्हणजे लोव प्राईस होय.

५. स्प्रेड

ठरलेल्या कालावधीसाठीची कमाल किंमत आणि किमान किंमत यातील फरक म्हणजे स्प्रीएड होय

६.वीक

शेअरच्या हाई प्राईस आणि क्लोझ / ओपन प्राईस मधील फरक म्हणजे वीक.

७.  टेल

शेअरच्या लोव प्राईस आणि क्लोझ / ओपन प्राईस मधील फरक म्हणजे टेल.

८.  बॉंडी (Body)

कॅण्डलच्या ओपन आणि क्लोज प्राईस मधील फरक म्हणजे कॅण्डलची बॉडी होय

९.  रंग

कॅण्डलस्टिक्स चार्ट वर कॅण्डलचे फक्त २च रंग असतात लाल आणि हिरवा.

लाल रंगाची कॅण्डल असे दर्शविते कि ठरलेल्या काळात शेअरची किंमत हि कमी झाली आहे याउलट हिरव्या रंगाची कॅण्डल असे दर्शवते कि शेअरच्या किमतीत वाढ झाली .

कॅन्डलस्टिक चे फायदे:

कॅन्डलस्टिक चार्ट विश्लेषणामध्ये पारंगत असलेला अनुभवी गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट स्टॉकबद्दल माहितीचे अनेक पैलू मिळवू शकतो.

उदाहरणार्थ, ऍक्सिस बँक लिमिटेडच्या शेअरच्या किमतीतील चढउतार आणि क्लोझिंग प्राईसचा विचार करता या शेअर ची किंमत मार्च २०२३ मध्ये रु ८३७ होती आणि या वर्षी म्हणजेच मार्च २०२४ मध्ये त्याची किंमत रु १,०४० झाली आहे.

अशाप्रकारे, गेल्या वर्षभरात, ऍक्सिस बँक ने सध्याची आर्थिक दुरवस्था दूर केली आहे.  या संख्यांच्या कँडलस्टिक विश्लेषणातून, 2 निष्कर्ष काढता येतात –

भारतातील देशांतर्गत फायनांशिअल सर्विसेस पुरवणाऱ्या कंपन्या चांगली कामगिरी बजावत आहेत.

या क्षेत्रात योगदान देणारे सर्व सहायक उद्योग लॉकडाऊननंतर हळूहळू पूर्ण क्षमतेने परतत आहेत.

अशाप्रकारे अनुभवी गुंतवणूकदार  विविध प्रकारच्या पॅरामीटर्सचा वापर करून बाजार किंवा विशिष्ट क्षेत्राच्या तपशीलांचे विश्लेषण करू शकतो. या वरून आपण बघू शकतो कि कॅण्डल स्टिक चार्ट च्या आधारे हि माहिती समजणे आपल्याला खूप सोपी पडते.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!