राजकारणातील बदलते वारे पाहून अमेरिकेतील सर्वात मोठ्या समजल्या जाणा-या सिटी बॅंकेने आज कॅाइनबेस या अमेरिकन एक्सचेंजेस वर नोंदवलेल्या एकमेव बिटकॅाइन एक्सचेंजचे शेयर्स विकत घेण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे.
अमेरिकेतील राजकीय आणि कायदेशीर परिस्थितीत होणारे बदल हे कॉइनबेस या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजसाठी सकारात्मक असू शकतात, असे संकेत देत सिटी ग्रुपच्या विश्लेषकांनी कंपनीच्या शेअर्ससाठी रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून ‘बाय’ मध्ये सुधारली आहे. या निर्णयामुळे कॉइनबेसच्या भविष्यातील वाढीच्या शक्यतांमध्ये वाढ झाली आहे.
काय म्हणालेत सिटी ग्रुपचे विश्लेषक?
सिटी ग्रुपच्या विश्लेषकांच्या मते, अमेरिकेत क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्रात अधिक अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉइनबेसला फायदा होऊ शकतो. या अनुकूल वातावरणाची दोन प्रमुख कारणे आहेत –
- बदलते राजकीय वातावरण : अमेरिकेतील आगामी निवडणुकांमध्ये क्रिप्टोकरन्सीला अनुकूल असलेले सरकार येण्याची शक्यता आहे.अशा सरकारमुळे क्रिप्टोकरन्सीच्या नियमावलीत सकारात्मक बदल होऊ शकतात. यामुळे गुंतवणूकदारांचा क्रिप्टोमध्ये सहभाग वाढण्याची शक्यता आहे.
- नुकताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय : अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे, सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) या संस्थेकडून क्रिप्टोकरन्सीवर होणारे नियमन कडक होण्याची शक्यता कमी होऊ शकते. असे झाल्यास कॉइनबेसला फायदा होईल.
कॉइनबेससाठी चांगली बातमी
सिटी ग्रुपच्या विश्लेषकांनी कॉइनबेसच्या शेअर्ससाठी नवीन टार्गेट प्राईस देखील जाहीर केला आहे. त्यांच्या मते, येत्या काही महिन्यांत कॉइनबेसच्या शेअर्सची किंमत $345 इतकी वाढू शकते.
गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ?
सिटी ग्रुपच्या या निर्णयामुळे कॉइनबेसच्या भविष्यातील वाढीच्या शक्यतांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ल्यागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच, स्वतःचा अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.