चीन अमेरिकेपासून दूर जाण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून गेल्या सात महिन्यांपासून सतत अमेरिकन डॉलर बॉण्ड्सची विक्री करत आहे आणि एका आकडेवारी नुसार गेल्या साता महिन्यात चीनने ७४ अब्ज डॉलरच्या अमेरिकन सरकारी बॉण्डची विक्री केली आहे. हे सरकारी बॉण्ड्स विकून चीन सोन्याची खरेदी करत आहे.
पीपल्स बँक ऑफ चायना (PBOC) च्या माहितीनुसार, चीनकडे २०२४ मध्ये एप्रिल महिना अखेरी पर्यंत २,२५० टन सोने जमले आहे ज्याची किंमत जवळपास १५९ अब्ज डॉलर्स एवढी आहे. गेल्या काही वर्षांपासून ब्रिकस देशात डॉलर्सची सद्दी संपवावी असा सूर उठत आहे, चीनच्या रणनीतीमधील हा बदल हा ब्रिक्स देशांच्या डॉलरच्या वापसीच्या (de-dollarization) अजेंड्याशी सुसंगत आहे ज्यामुळे अमेरिकन डॉलरला त्याच्या वर्चस्वाच्या जागेवरून खाली खेचायला सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल .
ब्रिक्स मधील अनेक देश २०२२ पासून सोन्याची सर्वात मोठी खरेदी करणारे देश आहेत ज्यांनी आपल्या अमेरिकन बॉण्ड्सला विकून त्या जागी सोने खरेदी चालू केली आहे. फक्त २०२४ च्या पहिल्या तिमाहीत चीनने अंदाजे ५३.३ अब्ज डॉलरच्या अमेरिकन सरकारी बॉण्डची विक्री केली.
२०२३ च्या शेवटच्या काही महिन्यांत चीनने आणखी २१ अब्ज डॉलरच्या अमेरिकन सरकारी बॉण्डची विक्री केली. एकूणच, या आशियाई देशाने केवळ सात महिन्यांत ७४ अब्ज डॉलरच्या अमेरिकन सरकारी बॉण्डची विक्री केली आहे. हा विकास दाखवतो की अमेरिकेचे कर्ज ३४.४ ट्रिलियन डॉलरवर गेले असताना ब्रिक्सना अमेरिकन बॉण्ड्समध्ये आत्मविश्वास नाही.
इन्व्हेस्टमेंट बँकिंग: भांडवल निर्मिती आणि आर्थिक व्यवहारातील मध्यस्थ
ब्रिक्स आपल्या डॉलरच्या वापसीच्या (de-dollarization) मोहिमेवर पुढे जात असताना अमेरिकन सरकारी बॉण्डची विक्री करत आहे आणि ही अमेरिकेसाठी एक प्रमुख चिंता आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून आहे. चीन, इतर ब्रिक्स देशांसोबत, हे संबंध तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. हे सर्व विकसनशील देश अमेरिकन बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त झाल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आणखी ताण येणार यात आता काहीच शंका राहिलेली नाही .
ब्रिक्सच्या आर्थिक आघाडीने युरोपीय व्यापारावर भर देण्याचा विचार चालू केला आहे ज्यामुळे अमेरिकन डॉलरवर आणखी परिणाम होईल. चीनने अलीकडे आपल्या स्वतःच्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये युरोपीय देशांशी व्यापार संबंध मजबूत करणे समाविष्ट आहे.
चीन आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाची आर्थिक प्रगती आणि सुधारणा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सरकारी मालकीच्या उद्योगांच्या नेत्यांशी आणि परदेशी गुंतवणुकदारांशी बोलताना भर दिला. तसेच आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी युरोपीय नेत्यांशीही चर्चा केल्या.