fbpx

टर्की आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नियमावलीशी सुसंगत क्रिप्टो कायदा करण्याचा विचार करत आहे

टर्कीमध्ये आभासी चलन प्रचंड लोकप्रिय आहे , बिटकॉइनची किंमत जशी वाढते तशी टर्की मध्ये आभासी चलनाची लोकप्रियता गगनाला भिडते आहे. परंतु, सध्या आभासी चलनाचे नियमन व्यवस्थित होत नाही. यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही म्हणूनच यावर तोडगा काढण्यासाठी टर्कीश सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नियमावलीशी सुसंगत असा क्रिप्टो कायदा करण्याचा विचार  करत आहे.

आंतरराष्ट्रीय नियमावलीशी सुसंगतता

या नवीन कायद्यामुळे टर्कीची क्रिप्टो क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा उंचावली जाण्यास मदत होईल. तसेच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) द्वारे केलेल्या टीकांचीही दखल घेतली जाईल. FATF ही आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करणारी संस्था आहे. क्रिप्टो क्षेत्रातील मनी लाँड्रिंग रोखण्यासाठी FATF ने विशिष्ट नियमावली सुचवली आहेत. टर्कीचा हा नवीन कायदा या नियमावलीशी सुसंगत असेल.

आभासी चलनांचा उदय: इतिहास, तंत्रज्ञान आणि भविष्य

आभासी चलन आणि पारंपारिक चलन यांच्यातील फरक

कायद्याची वैशिष्ट्ये

  • टोकन सेवा देणारे (VASPs) यांचे परवाना आणि नोंदणी: हा कायदा क्रिप्टो सेवा पुरवणार्‍यांसाठी परवाना आणि नोंदणी प्रणाली लागू करेल. यामुळे ग्राहकांचे हितसंबंध जपून राहतील आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत होईल.
  • कॅपिटल मार्केट्स बोर्ड (SPK) चा कठोर देखरेख: क्रिप्टो सेवा देणार्‍यांवर कडक नजर ठेवण्याची जबाबदारी कॅपिटल मार्केट्स बोर्ड (SPK) या संस्थेकडे राहील.
  • ग्राहकांचे संरक्षण: गुंतवणुकदारांचे हितसंबंध जपणे आणि त्यांचे संरक्षण करणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.

आभासी चलनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही प्रणव जोशी लिखित ब्लॉकचेन बँडिट्स हे पुस्तक वाचू शकता

कायद्याची अंतिम रूपरेषा येणे अजून बाकी 

टर्कीच्या संसदेत हा कायदा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे या कायद्याची अंतिम स्वरुपाची वाट पाहणे बाकी आहे. तरीही, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या नियमावलीशी सुसंगत क्रिप्टो कायदा करण्याचा टर्कीचा प्रयत्न हा क्रिप्टो उद्योगासाठी सकारात्मक पाऊल मानला जातो.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!