28 C
Pune
Saturday, April 27, 2024

जनीं वंद्य ते : भालचंद्र गरवारे

Must read

विनय मोघे
विनय मोघे
विनय मोघे हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असले तरी ते एक तज्ज्ञ गुंतवणूकदार आहेत, केवळ नोंदणीकृतच नवे तर खाजगी कंपन्यात देखील त्यांच्या अनेक गुंतवणुका आहेत. 

त्यांचे खरे नाव ” भालचंद्र दिगंबर गरवारे” होते पण ते आबासाहेब गरवारे ह्या नावाने प्रचलित होते. त्यांचा जन्म २१ डिसेंम्बर १९०३ साली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला. त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांना व्यवसायात तोटा झाल्याने कर्जाचा डोंगर झालेला. त्यामुळे भालचंद्र गरवारेचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नव्हते, मुंबईत सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी  आपल्या उपजीविकेसाठी ऑटोमोबाईल व्यवसाय सुरू केला ज्यातून त्यांनी चार पैसे जोडले.

याच दरम्यान त्यांना सेकंड हॅन्ड कार बाजाराच्या संधीची व्याप्ती लक्षात आली आणि त्यांनी सेकंड-हँड कार विक्रीसाठी एजंट म्हणून काम करण्यास सुरवात केली. कालांतराने गिरगाव येथे त्यांनी आपली “डेक्कन मोटर एजन्सी” स्थापन केली आणि मोटारींचा विश्वासार्ह डीलर म्हणून नावलौकिक मिळवला. १९३३ मध्ये आबासाहेबांनी इंग्लंडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी इंग्लंडमध्ये सेकंड-हँड गाड्या स्वस्त होत्या. लंडनमध्ये त्यांनी केवळ सेकंड हँड गाड्यांचाच व्यापार केला नाही तर त्यांनी मंदीचा फायदा घेऊन व्यावसायिकांकडून कंपन्या खरेदी केल्या. या चालीमुळे त्याला चांगला नफा मिळाला. इंग्लंडमध्ये मोटारी खरेदी करण्याच्या त्यांच्या हालचालीमुळे दुसर्‍या हाताच्या कार व्यवसायावर चांगली पकड मिळू शकली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना प्लास्टिक व्यवसायाबद्दल माहिती झाली आणि त्यांनी नेव्हीसाठी प्लास्टिक ची बटणे बनवायला सुरवात केली आणि त्यानंतर त्यांचे प्लास्टिक व्यवसायातील साम्राज्य उभं राहिले आणि मग पाहता पाहता गरवारे नायलॉन, गरवारे प्लास्टिक, गरवारे  वॉल रोप्स या कंपन्यांचा जन्म झाला.

आबासाहेब हे गांधीजींच्या विचारांवर चालणारे व्यावसायिक होते. त्यांनी शिक्षणासाठी भरीव मदत केली, पुण्यातील वासुदेव बळवंत फडके यांनी चालू केलेल्या एमईएस कॉलेजला दिलेल्या देणगीमुळे या कॉलेजचे नाव बदलून आबासाहेब गरवारे कॉलेज करण्यात आले. १९५९ साली आबासाहेब मुंबईचे शेरीफ बनले तर काही काळ ते स्टेट बँकेचे अध्यक्ष देखील होते.
आबासाहेब गरवारे यांना १९७१ साली भारत सरकारने “पदम भूषण” पुरस्कार देऊन गौरव केला.
आबासाहेबांना चार मुलं अशोक, शशिकांत, रमेश आणि चंद्रकांत व एक मुलगी प्रभा चंद्रचूड. आबासाहेबांनंतर त्यांचा व्यवसाय चार मुलांमध्ये वाटण्यात आला गरवारे मरिन अशोक गरवारे यांच्या अधिपत्या खाली आली तर गरवारे पॉलिस्टर आणि गरवारे केमिकल या कंपन्या शशिकांतकडे आल्या, गरवारे वॉलरोप्स रमेशकडे आली तर गरवारे सिंथेटिक्स हि कंपनी चंद्रकांत कडे आली. आज गरवारे साम्राज्यात जवळपास १०० कंपन्यांचा समावेश आहे. यातल्या अनेक कंपन्या भांडवल बाजारात नोंदणीकृत देखील आहेत.

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!
×