स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, ग्रीक सरकार क्रिप्टोकरन्सी आणि डिजीटल मालमत्तांवर कर आकारणी करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. काही सूत्रांच्या मते ग्रीस सरकार सध्या कार्यपतो टॅक्सेस साठी मसुदा बनवायचे काम करत आहे आणि २०२५ च्या सुमारास ग्रीस कर आकारणी चालू करायची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या नियमानुसार ग्रीस सरकार या क्रिप्टो करन्सी किंवा डिजिटल मालमत्तांना कोणतीही मान्यता देत नाही.
जुलाई १५, २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सप्टेंबर २०२४ पर्यंत क्रिप्टोकरन्सी आणि डिजीटल मालमत्तांवर कर आकारणीची चौकट तयार करेल. या चौकटीमध्ये तीन प्रमुख मुद्दे समाविष्ट असतील:
-
- सर्व क्रिप्टोकरन्सींचे वर्गीकरण आणि नोंद
- कर आकारणी पद्धत
- देखरेख प्रक्रिया
अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत क्रिप्टोकरन्सी आणि डिजीटल मालमत्तांवर कर आकारणी सुरू होण्याची शक्यता आहे. वृत्तपत्रात असे सुचविले आहे की, क्रिप्टो आणि डिजीटल मालमत्तांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर सिक्युरिटीजच्या विक्रीवरील भांडवली नफ्याप्रमाणेच १५% दराने कर आकारला जाईल.सध्या, ग्रीसमध्ये क्रिप्टोकरन्सीवर कोणताही कर नाही. त्यामुळे, अनेक गुंतवणुकदार कर भरत नाहीत. सरकारला असे वाटते की या कर आकारणीमुळे सरकारी तिजोरीत भरती वाढेल.
ग्रीसमधील क्रिप्टो परिस्थिती
- ग्रीसमध्ये क्रिप्टो वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: 30 वर्षांच्या आसपासच्या लोकांमध्ये क्रिप्टोचा वापर वाढताना दिसतोय.
- देशाची राजधानी असलेल्या अथेन्स शहरात क्रिप्टोशी संबंधित कार्यक्रम आणि मीटअपमध्ये वाढ झाली आहे.
- ग्रीक स्टॉक एक्सचेंज आणि सुई ब्लॉकचैन यांनी नुकताच सहकार्य करार केला आहे. या सहकार्यामुळे सुई इकोसिस्टमद्वारे नवीन निधी उभारणी यंत्रणा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही सर्व माहिती उपलब्ध असलेल्या वृत्तपत्रीय बातम्यांवर आधारित आहे. कर आकारणीची अंतिम चौकट आणि नियमावलींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर सरकारच्या अधिकृत घोषणा आणि अंतिम नियमावलींची वाट पाहा.