आभासी चलनांचा उदय: इतिहास, तंत्रज्ञान आणि भविष्य

आभासी चलनांचा उदय मागच्या दशकात झाला आहे, हे चलन जरी फार जुने नसले आणि त्याला मोठा काही इतिहास जरी नसला तरी या चलनात आर्थिक व्यवस्थेमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे हे आता अवघ्या जगाने पहिले आहे. पारंपारिक चलनापेक्षा अनेक फायदे आभासी चलनाच्या वापरातून होतात. संपूर्ण पारदर्शक व्यवहार असले तरी व्यवहार करणारा नामा निराळा असे काहीसे या व्यवहारांचे स्वरूप आहे.

इतिहासाची पानं उलटून पाहताना

क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे २००९ मध्ये बिटकॉईन नावाच्या पहिल्या क्रिप्टोकरन्सीची निर्मिती. सातोशी नाकामोटो नावाच्या अनामिक व्यक्तीने विकेंद्रीकृत डिजिटल चलन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची संकल्पना सादर करून जगाला क्रिप्टोकरन्सीशी परिचित करून दिले.

सातोशी नाकामोटो कोण होता, खरंच असा कोणी माणूस होता किंवा नाही याबद्दल बरेच विवाद आभासी चलनाच्या जगतात आहेत पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या नावाने बिटकॉइन जगातला पहिला व्यवहार केला गेला होता.  बिटकॉइन म्हणजे काय हे लिहणारा पहिला शोध निबंध देखील याच नावाने सापडतो. हळू हळू बिटकॉइनला मान्यता मिळू लागली आणि २०१० मध्ये याची किंमत ०. 0१ डॉलर एवढी झाली.

२०११ सालात आभासी जगतात  लिटकॉईन नावाची दुसरी क्रिप्टोकरन्सी उदयास आली. त्यानंतर आभासी चलनांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. २०१३ साला पर्यंत बिटकॉईनची किंमत १००० डॉलर्स पर्यंत पोहोचली, ज्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये हळूहळू गुंतवणूक वाढू लागली. आभासी जगता बद्दल लोकांना कुतूहल वाढू लागले, आभासी चलनाच्या व्यवहारासाठी मग एक्सचेंजेस उभी राहू लागली.  साधारण २०१५ च्या सुमार मग इथेरियम नावाची क्रिप्टोकरन्सी बाजारात आली, ज्याने स्मार्ट करारांची संकल्पना सादर करून क्रिप्टोकरन्सीच्या कार्यक्षमतेत क्रांती घडवून आणली.

तंत्रज्ञानाचा पाया

आभासी चलनाचा पाया ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत, जे डिस्ट्रीब्युटेड लेजर या प्रकारात मोडते.  या लेजर मध्ये नोंदवलेले सर्व व्यवहार हे पारदर्शक असतात, हे कोणालाही पाहण्यास उपलब्ध असतात. या लेजर मध्ये सर्व व्यवहारांच्या नोंदी ठेवल्या जातात. हे तंत्रज्ञान आभासी चलनांना  सुरक्षित, पारदर्शक आणि हेराफेरीमुक्त बनवते.

 ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा विकास सर्वत्र होऊ लागला आहे. जमिनींचे व्यवहार नोंदवण्यापासून ते जहाजांच्या हालचालणी पर्यंत अनेक गोष्टीत आता ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे.

भविष्यातील शक्यता

क्रिप्टोकरन्सी अजूनही नवीन तंत्रज्ञान आहे, परंतु त्यात अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे, जसे की:

  • आर्थिक समावेश: क्रिप्टोकरन्सी जगभरातील लोकांना पारंपारिक बँकिंग सेवांमध्ये प्रवेश नसलेल्या लोकांसाठी आर्थिक सेवांमध्ये प्रवेश प्रदान करू शकतात.
  • आंतरराष्ट्रीय पेमेंट: क्रिप्टोकरन्सी आंतरराष्ट्रीय पेमेंट अधिक जलद, स्वस्त आणि कार्यक्षम बनवू शकतात.
- Advertisment -

वाचनीय असे काही

error: Content is protected !!