अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने FIT21 क्रिप्टो विधेयक मंजूर केले

अमेरिकेच्या प्रतिनिधिसभागृहाने बुधवार दिनांक २२ मे २०२४ रोजी “फायनान्शियल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर द 21st सेंच्युरी (FIT21)”  नावाचे आभासी चलना संदर्भातील विधेयक मंजूर केले.   या विधेयकामुळे अमेरिकेच्या डिजिटल मालमत्तेच्या बाजारपेठेत नियमकांची निर्णायक भूमिका असेल हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच ग्राहकांचे संरक्षण सुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे.

हे  विधेयक २७९ विरुद्ध १३६ अशा  मताधिक्याने मंजूर झाले. या प्रस्तावाला २०८ रिपब्लिकन आणि तब्बल  ७१ डेमोक्रॅट खासदारांनी पाठिंबा दर्शवला होता. या विधेयकासाठी डेमोक्रॅट्स कडून रिपब्लिकन्सना मिळालेली साथ खूपच लक्षणीय होती. यावरूनच अंदाज येतो की अमेरिकेसाठी आभासी चलनाचे नियमन हा मोठा गंभीर विषय बनत चालला आहे. या विधेयकाद्वारे आभासी चलनांच्या जगतावर अधिराज्य करायला अमेरिका सज्ज होत असल्याचेच निर्देश मिळत आहेत.

आभासी चलनांचा उदय: इतिहास, तंत्रज्ञान आणि भविष्य

आभासी चलनांच्या खनन कर्मावर व्हेनेझुएलाने घातली बंदी 

FIT21 विधेयकामुळे काय होणार?

  • नियमनाची स्पष्टता (Regulatory Clarity): FIT21 विधेयकामुळे क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचैन तंत्रज्ञानावर (blockchain technology) कसे नियमन करावे याबाबत स्पष्टता येईल. यामुळे क्रिप्टो व्यवसायांना आणि गुंतवणुकदारांना (investors) मार्गदर्शन मिळेल.
  • ग्राहकांचे संरक्षण (Consumer Protection): FIT21 विधेयकात ग्राहकांचे हित जपण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे गुंतवणूक करताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
  • बँकांना परवानगी (Permission for Banks): हा विधेयक पास झाल्यानंतर बँकांना क्रिप्टोकरन्सी ग्राहकांची गुंतवणूक सांभाळण्याची (custody) परवानगी मिळू शकते. यामुळे गुंतवणूकदारांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल.

या विधेयकामुळे क्रिप्टो बाजारपेठेचा विकास आणि विस्तार होण्यास मदत होईल असे सभागृह आर्थिक सेवा समिती (HFSC) च्या अध्यक्षांनी एका पत्रांद्वारे कळवले.

आपल्याला कदाचित वाचायला आवडेल – ब्लॉकचेन बैंडिट्स हे प्रणव जोशी लिहीत पुस्तक 

पुढील टप्पा

हे विधेयक आता अमेरिकेच्या सेनेटकडे (Senate) जाते. सेनेटमध्ये या विधेयकावर चर्चा होणार असून त्याला मंजुरी मिळणे किंवा न मिळणे अद्याप स्पष्ट नाही. कारण सेनेटमध्ये अजून FIT21 ला पर्यायी (counterpart) विधेयक नाही.

FIT21 अमेरिकेच्या क्रिप्टो उद्योगासाठी एक मोठी उपलब्धी आहे. हे विधेयक पास झाल्यास अमेरिकेच्या क्रिप्टो बाजारपेठ अधिक नियंत्रित आणि ग्राहकांसाठी सुरक्षित होण्यास मदत होईल.

- Advertisment -

वाचनीय असे काही

error: Content is protected !!