‘हुप्पा हुय्या २’: भव्यदिव्य सिक्वेलची घोषणा, १५ वर्षांनंतर परत जय बजरंगा

‘हुप्पा हुय्या’ म्हटलं की ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून निघते. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या २’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

पहिल्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मारुतीरायाने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड यांचा ‘हुप्पा हुय्या २’ पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने सज्ज होणार आहे.

चित्रपटाच्या तयारीत अंतिम टप्पा

चित्रपटाच्या लेखनाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे जाहीर केली जाणार आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांना कथानक आणि तांत्रिकदृष्ट्या भुरळ घालणारा हा सिक्वेल असेल, असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.

समित कक्कड यांचा नवा सिनेमा: प्रेक्षकांसाठी विशेष मेजवानी

दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले, ‘हुप्पा हुय्या २’ हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल, असा विश्वास मला आहे. आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कटतेने आणि भव्यदिव्य पद्धतीने साकारणार आहोत.’

https://www.instagram.com/p/DEyyWY8oflJ/?igsh=MWRhNTIzY2N6Z3U3aA==

समित कक्कड हे ‘रानटी’, ‘हाफ तिकीट’, ‘धारावी बँक’, ‘इंदोरी इश्क’, ‘आयना का बायना’, ‘आश्चर्यचकीत’, ‘३६ गुण’ अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांच्या कल्पक दृष्टीकोनामुळे आणि सिनेमाच्या तांत्रिक अंगांवरील भक्कम पकडीतून ‘हुप्पा हुय्या २’ हा चित्रपटही कलात्मकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेणार, यात शंका नाही.

‘हुप्पा हुय्या २’ची निर्मिती टीम

समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या २’ ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड करत आहेत. चित्रपटासाठी संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे असून लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.

‘संकटात धैर्य, संघर्षात साहस आणि विजयात विनम्रता शिका’ अशी मारुतीरायाची शिकवण मानणाऱ्या ‘हुप्पा हुय्या २’च्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच रसिकांना मंत्रमुग्ध करेल, अशी अपेक्षा आहे.

atharva.chivate
atharva.chivate
अथर्व चिवटे हे न्यूजइंटरप्रिटेशनच्या युट्युब चॅनेलचे दिग्दर्शक आहेत.  दिग्दर्शकाच्या जबाबदाऱ्यां व्यतिरिक्त, अथर्व  एक चित्रपटप्रेमी आणि लेखक देखील आहे.ते  नियमितपणे आगामी चित्रपटांच्या समीक्षणांवर लेखन करतात. उद्योगातील ट्रेंडचे विश्लेषण करणे, आकर्षक कथा तयार करणे आणि विविध प्लॅटफॉर्मवर कथा प्रभावीपणे पोहोचावं  हेअथर्वचे  कौशल्य आहे.

TOP 10 TRENDING ON NEWSINTERPRETATION

GreedyBear hackers steal over $1 million in massive multi-vector crypto attack

A hacker group known as GreedyBear has stolen more...

Optus sued by privacy regulator over data breach affecting 9.5 million Australians

Regulator Takes Legal Action Over Data Breach Australia’s privacy regulator...

🕵️ Hackers exploit Dalai Lama’s 90th birthday with fake apps to spy on Tibetans

On the 90th birthday of the Dalai Lama, something...

Google Gemini vulnerability allows hackers to use calendar invites to control smart home devices

A shocking cybersecurity discovery has revealed that hackers can...

Over 115 million U.S. cards exposed in large-scale phishing and wallet fraud scheme

A large-scale cyberattack has put millions of people in...

Belarusian hackers destroy Aeroflot servers, steal 22 terabytes of data in targeted cyber operation

Belarusian hackers take credit for Aeroflot cyberattack A group of...

How fraudsters tricked users with fake apps-HDFC Bank’s latest warning

HDFC Bank, India’s largest private sector bank, has issued...

🔐 Massive Data Breach in Washington: 348,000 Medical Records Exposed in Cyber Attack on Mt. Baker Imaging

A large-scale cyber attack has compromised the private information...

Related Articles

Popular Categories

error: Content is protected !!