२०२४ हे वर्ष भारतासाठी आणि अमेरिकेसाठी दोन्ही महत्त्वपूर्ण निवडणुकांचे वर्ष आहे. भारतात सर्वत्रिक निवडणुका होत असून, अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. निवडणुका जवळ येत असताना, शेअर बाजारावर त्यांचा काय परिणाम होईल याची चिंता गुंतवणूकदारांना वाटू लागते. या कालावधीमध्ये ज्या कंपन्यात थेट राजकीय हस्तक्षेप असतो त्या समभागांच्या किमती ब-याच प्रमाणात अस्थिर होऊ लागतात.
निवडणुका आणि बाजारातील अस्थिरता
मागील २५ वर्षांचा इतिहास पाहता, निवडणुकीपूर्वी आणि नंतरच्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात अस्थिरता दिसून येते. याची अनेक कारणे आहेत:
सरकारी धोरणातील बदल
निवडणुकीनंतर नवीन सरकार येऊ शकते आणि त्यांचे धोरणे विद्यमान सरकारपेक्षा वेगळे असू शकतात. यामुळे काही कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सत्तेवर येणारा पक्ष जरी तोच राहिला तरी मंत्रीमंडळात नवीन चेह-यांना संधी दिली जाते आणि मग नवीन मंत्री त्यांच्या नवीन विचारसरणीसह, नवीन सहका-यांसह नवीन उपक्रम राबवू पाहतात आणि अशा वेळेस पूर्वीच्या काही उपक्रमांना धक्का लागू शकतो.
आर्थिक धोरणातील बदल
निवडणुकीनंतर सरकार आर्थिक धोरणात बदल करू शकते. यामुळे व्याज दर, कर आणि गुंतवणुकीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात.
लोकांची मानसिकता
निवडणुकीनंतर लोकांची मानसिकता बदलू शकते. यामुळे खरेदी आणि खर्च करण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ शकतो.
निवडणुकीचा विविध क्षेत्रांवर परिणाम
बँकिंग: निवडणुकीनंतर बँकिंग क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजना करू शकते.
कंझ्युमर ड्युरेबल: निवडणुकीनंतर लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढू शकते, ज्यामुळे कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
माहिती तंत्रज्ञान: माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे निवडणुकीनंतरही चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.
इतर क्षेत्रे: इतर क्षेत्रांवर निवडणुकीचा परिणाम सरकारच्या धोरणांवर आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असेल.
गुंतवणूकदारांसाठी काय सल्ला?
दीर्घकालीन गुंतवणूकदार: दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी निवडणुकीबाबत चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी आपली गुंतवणूक धोरणानुसार चालू ठेवावी.
अल्प आणि मध्यमकालीन गुंतवणूकदार: अल्प आणि मध्यमकालीन गुंतवणूकदारांनी नवीन सरकारच्या धोरणांवर लक्ष ठेवावे आणि त्यानुसार आपली गुंतवणूक बदलू शकतात.
स्विंग ट्रेडर्स: स्विंग ट्रेडर्सना बाजार अस्थिरतेमध्ये असलेल्या संधींचा लाभ घेता येईल.
ETF मध्ये गुंतवणूक करणारे: ETF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी अर्थव्यवस्थेबद्दल समाधानकारक असल्यास गुंतवणूक चालू ठेवावी आणि संधी मिळाल्यास वाढवावी.
नोंद: हा लेख वाचकांना शेअर बाजाराची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी SEBI नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.