मायक्रोस्ट्रॅटेजी बिटकॉइनपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी का करत आहे?

मायक्रोस्ट्रॅटेजी बिटकॉइनपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी का करत आहे?

मायक्रोस्ट्रॅटेजीची बिटकॉइनवरील प्रीमियम कंपनीच्या व्यवस्थापनावर गुंतवणुकदारांचा विश्वास, अधिक बिटकॉइन मिळवण्यासाठी कर्ज वाढवण्याची त्यांची रणनीती आणि फक्त त्यांच्या बिटकॉइन होल्डिंगच्या मूल्यापलीकडे कंपनीची भविष्यात व्यवसाय वाढ करण्याची क्षमता दर्शवते. .

२०२४च्या पहिल्या तिमाहीत, मायक्रोस्ट्रॅटेजीने ११.५ कोटी डॉलर्स एवढी विक्री  नोंदवली आहे , जी खरं तर विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे विश्लेषकांना  १२.७१ कोटी डॉलर्सची उलाढाल अपेक्षित होती. या तिमाही अखेरीस कंपनीने ५.३ कोटी डॉलर्सचा शुद्ध तोटा नोंदवला आहे. म्हणजेच प्रति शेअर ३.०९ तोटा नोंदवला आहे.

आभासी चलनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही प्रणव जोशी लिखित ब्लॉकचेन बँडिट्स हे पुस्तक वाचू शकता

यादरम्यान, मायक्रोस्ट्रॅटेजीने ३ कोटी डॉलर्सचे दीर्घकालीन कर्ज  देखील घेतले आहे  ज्याची परतफेड त्यांच्या मुख्य व्यवसायामधून निर्माण होणार्‍या रोख प्रवाहाद्वारे केली जाऊ शकते. कंपनी येत्या तिमाहीत त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणून बिटकॉइनवर आधारित विकेंद्रीकृत आयडी सोल्यूशन बांधत आहे. तसे पाहता त्यांचे निकाल उत्साहवर्धक नाहीत पण तरी देखील त्यांच्या समभागात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेला बिटकॉइनचा साठा.

मार्च २०२१ मध्ये, मायक्रोस्ट्रॅटेजीकडे १.१३ कोटी शेअर्स नोंदणीकृत होते  आणि त्यांच्याकडे ९१०६४ एवढे बिटकॉइन होते याचाच दुसरा अर्थ प्रति शेअर सुमारे 0.00८०५९ एवढे बिटकॉइन होते. डिसेंबर २०२२ पर्यंत, कंपनीने अजून बिटकॉइन खरेदी करत त्यांचा साठा १३२५०० बिटकॉइन पर्यंत नेला आणि त्यांचे समभाग १.१५ एवढेच मर्यादित राहिले, ज्यामुळे प्रति शेअर बिटकॉइनची उपलब्धी सुमारे 0.0११५२२ पर्यंत वाढली.

मायक्रोस्ट्रॅटेजिची प्रमुख स्पर्धक कंपनी कॉइनबेस आहे. सध्या अमेरिकेच्या नियमकांनी कॉइनबेसवर खटला भरल्याने त्यांच्या समभागांच्या किमतींना सध्या ग्रहण लागले आहे तर टेस्ला ही अजून एक बिटकॉइनधारक कंपनी आहे जी अमेरिकेतील भांडवल बाजारात नोंदवली गेली आहे. टेस्लाचे पण समभाग बिटकॉइन पेक्षा खराब कामगिरी करताना दिसत आहे ते प्रामुख्याने त्यांची उलाढाल कोरोना नंतर प्रचंड रोडावली गेल्यामुळे. अशा परिस्थितीत बिटकॉइन मध्ये थेट गुंतवणूक ना करता ज्यांना बिटकॉइनच्या किमतीमधील बदलांचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्या साठी मायक्रोस्ट्रॅटेजि चा समभाग उत्तम गुंतवणुकीचा पर्याय दिसत आहे.

TOP 10 TRENDING ON NEWSINTERPRETATION

North Korea’s Cyber Army Exposed—More Than Just Lazarus Group Behind $1.4B Crypto Heist

North Korea is carrying out more cyberattacks than ever....

Shocking Fake Zoom App Spreading Malware – How It’s Stealing Your Data

Cybercriminals are using a sneaky trick to steal your...

Shocking Cyber Heist: Hackers Breach Australia’s Top Pension Funds, 20,000+ Accounts Hit

Australia’s pension funds, where millions of people keep their...

How Attacks on Transportation Systems Can Endanger Human Lives

Transportation Systems are something we all use every day....

FBI Raids Leader of Gay Furry Hacking Group Behind Project 2025 Cyberattack

The FBI has raided the home of the leader...

Shocking Cyber Scam: 2,600+ Fake Phones Sold with Crypto-Stealing Malware

Hackers have found a new way to steal money....

Sneaky Chaos: Drone Embedded Malware Shakes Up Russia-Ukraine War

The war between Russia and Ukraine is full of...

Shocking New Android Trojan TsarBot Targets 750+ Banking and Crypto Apps

A new Android banking trojan, known as TsarBot, has...

Related Articles

Popular Categories

error: Content is protected !!