कोणी कर्ज घेतले की पुढचा प्रश्न तयारच असतो. तो म्हणजे काय रे किती व्याजदर लागला? कोणाला जास्त व्याजदर लागला असेल तर समोरचा लगेच खुश होऊन त्याला कास कमी व्याजदर लागला याबद्दल बोलणी सुरु करतो. आता हा व्याजदर काय असतो आणि प्रत्येकासाठी वेगळा कसा ठरवला जातो ते आपण बघूया.
व्याजदर म्हणजे काय?
व्याजदर ही रक्कम कर्जदाराकडून आकारली जाते. ही रक्कम कारंज दिलेल्या मुद्दलाची टक्केवारी असते. कर्जावरील व्याज दर सामान्यत: वार्षिक आधारावर सूचित केला जातो. व्याज हे पैसे उधार घेण्याच्यासाठी आकारले जाणारे आर्थिक शुल्क आहे. आणि सहसा टक्केवारीच्या स्वरूपात व्यक्त केले जाते.
व्याजदर बहुतेक कर्जाच्या व्यवहारांवर लागू होतो. कर्जासाठी, व्याज दर कर्जाच्या रकमेवर म्हणजेच मुद्दलावर लागू केला जातो. व्याज दर म्हणजे कर्जदेयकासाठी असलेली कर्जाची किंमत आणि कर्जदारासाठी असलेला परताव्याचा दर. परतफेड केली जाणारी रक्कम सहसा कर्ज घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त असते कारण कर्जदेयकांना कर्जाच्या कालावधीत पैशाचा वापर न झाल्याने नुकसान भरपाईची आवश्यकता असते. कर्जदेयकाने कर्ज देण्याऐवजी त्या कालावधीत त्या रकमेची गुंतवणूक केली असती तर त्या रकमेतून उत्पन्न मिळाले असते. एकूण परतफेड रक्कम आणि मुद्दल यातील फरक म्हणजे आकारले जाणारे व्याज.
व्याजदराचे प्रकार
१. साधे व्याजदर:
जर का तुम्ही रु. ५,००,००० चे कर्ज घेतले असेल आणि तुमचा वार्षिक व्याजदर ७% असेल तर परतफेडीच्या वेळी ५,००,०००*७/१००= ३५,०००.
म्हणजेच एकूण परतफेडीची रक्कम ५,३५,००० होईल.
ही ३५,००० रु ही व्याजाची रक्कम वार्षिक आहे. ही रक्कम दार महिना थोडी थोडी अशी देखील भारत येऊ शकते.
जसे कि ५,००,०००*७/१००*१/१२= २,९१६. म्हणजेच तुमचा महिन्याचा व्याज २,९१६ रुपये इतका होईल.
२. चक्रवाढ व्याजदर:
काही कर्जदेयक चक्रवाढ व्याज पद्धतीला प्राधान्य देतात. याद्वारे कर्जदार व्याजात अधिक पैसे देतो. चक्रवाढ व्याजला व्याजावरील व्याज देखील म्हटले जाते. या प्रकारात मुद्दल आणि मागील कालावधीत जमा केलेल्या व्याजावर देखील व्याज लागू केला जातो. चक्रवाढ व्याज मोजताना थकीत व्याज हे साध्या व्याज पद्धतीचा वापर करून देय व्याजापेक्षा जास्त असते. यामध्ये आधीच्या महिन्यांपासून जमा झालेल्या व्याजासह मुद्दलावर मासिक व्याज आकारले जाते. कमी कालावधीसाठी, व्याजाची गणना दोन्ही पद्धतींसाठी समान असते. कर्जाचा कालावधी जसजसा वाढत जातो, तसतसे दोन प्रकारच्या व्याज गणनेतील फरक वाढत जातो.
व्याजदरांवर परिणाम करणारे घटक
बँकांद्वारे आकारला जाणारा व्याजदर अर्थव्यवस्थेची स्थिती अशासारख्या अनेक घटकांद्वारे निर्धारित केला जातो. देशाची मध्यवर्ती बँक (उदा. भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) व्याजदर ठरवते. मध्यवर्ती बँक जेव्हा व्याजदराच्या टक्केवारी वाढवते तेव्हा कर्जाची किंमत वाढते. कर्जाची जास्त किंमत लोकांना कर्ज घेण्यापासून परावृत्त करते आणि ग्राहकांची मागणी कमी करते. चलनवाढीसोबत व्याजदर वाढतात. चलनवाढीचा धोका कमी करण्यासाठी, बँका उच्च राखीव दर सेट करू शकतात.
जेव्हा पैशाचा पुरवठा कमी होतो किंवा कर्जाची मागणी जास्त असते. उच्च-व्याज-दर अर्थव्यवस्थेत, लोक बचत दरातून अधिक पैसे मिळत असल्याने त्यांचे पैसे साठतात. कमी व्याजदराच्या कालावधीत अनेकदा अर्थव्यवस्थांना चालना मिळते कारण कर्जदारांना स्वस्त दरात कर्ज मिळू शकते. बचतीवरील व्याजदर कमी असल्याने, व्यवसाय आणि लोकं हे पैसे खर्च करण्याची आणि गुंतवणूक करण्याची शक्यता अधिक असते. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
व्याजदारावर खालील गोष्टींमुळे देखील परिणाम होऊ शकतो. त्या म्हणजे
१. महागाई दर
२. मध्यवर्ती बँकेची धोरणे
३. कर्जासाठी असलेला पुरवठा आणि मागणी
४. क्रेडिट स्कोअर
५. देशाची आर्थिक परिस्थिती
६. जागतिक आर्थिक परिस्थिती
७. सरकारी कर्ज
थोडक्यात म्हणजे,व्याज दर म्हणजे कर्जदेयकासाठी असलेली कर्जाची किंमत आणि कर्जदारासाठी असलेला परताव्याचा दर. तुम्ही कर्ज घेता तेव्हा, तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्थेला भरपाई म्हणून काही अतिरिक्त रक्कम देणे अपेक्षित असते त्यालाच व्याज असे म्हणतात.