fbpx

लिमिनलने नाकारली वाजिरेक्स वरील हल्ल्याची जबाबदारी

क्रिप्टो वॉलेट कंपनी लिमीनलने नुकत्याच झालेल्या वाझिरएक्स हॅक प्रकरणी जबाबदारी नाकारली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हल्ला त्यांच्या युजर इंटरफेस मुळे झालेला नसून, वाझिरएक्सच्या डिव्हाइसवर झालेल्या तडजोडीमुळे झाला आहे.

वाजिरेक्स हा भारतातील एक प्रमुख क्रिप्टो एक्सचेंज आहे. जुलै १८ रोजी झालेल्या हल्ल्यात सुमारे २३५ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या (सुमारे १७.६ अब्ज रुपये) ची रक्कम चोरी झाली. या हल्ल्याने भारतातील क्रिप्टो बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली होती.

लिमीनल कंपनी ही मल्टि-सिग्नेचर वॉलेट तंत्रज्ञान पुरवते. या तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी अनेक जणांच्या सहमतीनेच क्रिप्टो रक्कम हलविली जाऊ शकते. वाझिरएक्सच्या बाबतीत, लिमीनलच्या म्हणण्यानुसार त्यांची सिस्टीम अशी होती की, वाझिरएक्सकडून तीन सही सही एखादी ट्रांझाक्शन आली तर लिमीनल आपोआप चौथी सही देईल.

परंतु, लिमीनल कंपनीचा दावा आहे की, वाझिरएक्सच्या तीन डिव्हाइसेसमध्ये तडजोड झाली होती. यामुळे हल्लेखोरांना चुकीची माहिती दाखवणारी बनावट ट्रांझाक्शन पाठवणे शक्य झाले. या चुकीच्या माहितीमुळे वाझिरएक्सच्या लोकांना खरी ट्रांझाक्शन असल्याचे वाटले आणि त्यांनी तिच्यावर सही केली. त्यामुळे लिमीनलची सिस्टीम वाझिरएक्सकडून आलेल्या या बनावट ट्रांझाक्शनवर चौथी सही देऊन टाकली.

लिमीनल कंपनीने प्रकरणाचा पोस्ट-मॉर्टेम रिपोर्ट जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “आमच्याकडे तीन वेगळ्या ऍडमिन खात्यांवरून व्यवहारांची माहिती आली. जेव्हा आमच्याकडे वाजिरेक्स कडून ३ डिजिटल सह्या असलेल्या व्यवहारांची माहिती येते तेव्हा चौथी सही जी आमच्या द्वारे करायची असते ती आपोआप केली जाते त्यात कोणताही मनुष्याचा सहभाग नसतो ही संपूर्ण तांत्रिक प्रणाली आहे. वाजिरेक्सच्या प्रणालीत कोणी छेडछाड करून जर आम्हाला तीन सह्या असलेल्या व्यवहाराची माहिती नोंदणीसाठी पाठवत असेल तर आमच्या प्रणालीला हे काळाने कधीच शक्य नाही आहे की हे व्यवहार वाजिरेक्सच्या परवानगीने आले आहे का विना परवानगी. त्यामुळे या विषयात अधिक खोलात जाण्याची गरज वाजिरेक्सला आहे आम्हाला नाही”.

या प्रकरणामुळे लिमीनल आणि वाझिरएक्स यांच्यातील जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. लिमीनल कंपनी आपल्या सिस्टीममध्ये कोणतीही अडचण नसल्याचा दावा करत आहे. परंतु, वाझिरएक्सकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हल्ला कसा झाला आणि जबाबदारी कुणाची याबाबत अद्याप संशय कायम आहे.

News Interpretation
News Interpretation
Hey I am Mohit. I am the editor of the Newsinterpretation. Writing is my passion and financial column writing is my hobby.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!