अमेरिकेच्या सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशन (SEC) ने स्पॉट ईथरच्या एक्सचेंज-ट्रेडेड फंडाला मान्यता देताना काही महत्वाची टिपण्णी केली. एक्सचेंज ट्रेडेड फंड ला मान्यता दिल्याने ईथर ही समभागासारखी सिक्युरिटी नाही, हे वित्तीय साधन नाही यावर आता बऱ्यापैकी मत ऐक्य झाले आहे.
या निर्णयाचा दुसरा अर्थ असा ही होतो की ईथर हे एखाद्या कंपनीच्या मालकीचे किंवा भागीदारीचे द्योतक नसून ते एखाद्या इतर कोणत्याही वस्तूप्रमाणे आहे ज्याच्या व्यवहारासाठी वेगळे एक्सचेंज असू शकते. जसे की भारतात तेल, गहू, सोने, चांदी यांचे व्यवहार कमोडिटी बाजारात होतात त्याच प्रमाणे इथर ही देखील आता तशीच एक वस्तू झाली आहे.
आभासी चलन आणि पारंपारिक चलन यांच्यातील फरक
आभासी चलनांच्या खनन कर्मावर व्हेनेझुएलाने घातली बंदी
आणि आता नियमकानी त्यांची इथर संदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याने हाच नियम कदाचित इतर आभासी चलनांना देखील लागू केला जाऊ शकतो. बिटकॉइन, लिटकॉइन किंवा रिपल हे सगळेच आता कदाचित वस्तू अथवा कमोडिटीच्या व्याख्येत बसू शकतात.
असे जरी असले तरी अजूनही नियामक ईथर स्टेकिंगशी संबंधित लोकांवर कारवाई करू शकते. कारण या मंजुरी नंतर हे जरी स्पष्ट असले कि ईथर ही एक वस्तू आहे आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहाराचे साधन नाही तरी स्टेकिंग बद्दल अजून पुरेशी स्पष्टता आलेली नाही. स्टेकिंग म्हणजे क्रिप्टोकरन्सी किंवा इतर डिजिटल मालमत्ता विकत घेऊन त्याच्या साठा करून ठेवणे. नंतर हा साठा भाड्याने देऊन यावर परतावा मिळवला जातो. स्टेकिंग हा विषय अजूनही वादग्रस्तच आहे त्यामुळे या विषयावर नियामक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे.
आभासी चलनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही प्रणव जोशी लिखित ब्लॉकचेन बँडिट्स हे पुस्तक वाचू शकता
शेवटी, अमेरिकन नियमकांनी अद्याप स्पष्टपणे सांगितले नाही आहे की ईथर ही सिक्युरिटी नाही. पण याबाबत अधिकृत निवेदन लवकरच येण्याची शक्यता आहे.