fbpx

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ४-अतिपरिचयादवज्ञा, अथपासून इतिपर्यंत

या सदरात शब्दांचा उगम, व्युत्पत्ति, शब्दार्थ तसेच व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह  जाणून घेता येईल

अतिपरिचयादवज्ञा

मूळ संस्कृत श्लोक असा-
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति |
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिन्धनम् कुरुते||

अर्थ: अतिपरिचय झाला म्हणजे अवज्ञा होते (दाट ओळखीच्या माणसाचा मानसन्मान कुणी ठेवत नाही), वारंवार जाणे येणे ठेवल्याने अनादर होतो.

उदाहरणार्थ: मलय पर्वतात राहणाऱ्या भिल्ल स्त्रिया चंदनाचे लाकूड सरपण म्हणून जाळतात.

 अथपासून इतिपर्यंत

प्राचीन ग्रंथ किंवा संस्कृत स्तोत्रे पाहिल्यास त्यांचा आरंभ ‘अथ’ पासून होतो आणि शेवट ‘इति’ पासून होतो.

जसे – अथ: श्री गणेशपुराणम् प्रारभ्यते
आणि – इति श्री मारुतीस्रोत्रम् संपूर्णम्

त्यावरून – ‘सुरुवातीपासून शेवटपर्यंत’ असा अर्थ रूढ झाला.

उदा. एकदा ती काही सांगायला लागली की अथपासून इतिपर्यंत सांगणारच; तिला नेमके बोलताच येत नाही.

नेहा लिमये
नेहा लिमये
मराठी भाषेच्या अभ्यासक. डिजिटल मीडियासाठी लघुकथा, लेख आणि ललितलेखन तसेच मराठीतून कायदेविषयक माहिती देणारे लेखन.#मराठीभाषा उपक्रमाला २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट डिजिटल कंटेंटसाठीचा सन्मान प्राप्त. व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी. गेले १५ वर्षे कंपनी कायदा, सेबी रेग्युलेशन संदर्भात सेवा व सल्लागार म्हणून कार्यरत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

वाचनीय असे काही

error: Content is protected !!