fbpx

भारतीय पतमानांकन संस्था: निवेशकांसाठी आवश्यक मार्गदर्शक

पतमानांकन संस्था कंपनी किंवा सरकारच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करून, केलेली गुंतवणूक कितपत सुरक्षित किंवा जोखीमपूर्ण असू शकते यावर आपले मत देतात. आर्थिक विश्लेषणावर आधारित रेटिंग देऊन, पतमानांकन संस्था निवेशकांना कुठे केलेली गुंतवणूक कमी जोखमीची ठरू शकते याबद्दल मार्गदर्शन करतात. या संस्था निवेशकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतात आणि त्यांची गुंतवणूक फायदेशीर ठरवण्यात मदत करतात.

संस्था कोणत्याही कंपनी किंवा सरकारच्या आर्थिक दायित्वांची पूर्तता करण्याच्या क्षमतेवर आधारित पतमानांकन नियुक्त करतात. ही मानांकने कंपनीमधील पत जोखमीचे सूचक म्हणून काम करतात.आणि निवेशकांना डीफॉल्टची शक्यता मोजण्यात आणि माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत करतात.

भारतातील नियामक फ्रेमवर्क

भारतात, पतमानांकन संस्था सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या नियमानाखाली येतात. SEBI त्यांच्या मूल्यांकनातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्यास नियमावली बनवते. SEBI द्वारे या संथांचे नियमन क्रेडिट रेटिंग एजन्सी रेग्युलेशन, १९९९ कायद्याद्वारे केले जाते. या कायद्याअंतर्गत  SEBI या संस्थांची नोंदणी, कामकाज आणि आचरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करते.

भारतातील प्रमुख पतमानांकन  संस्थांमध्ये  CRISIL, ICRA, CARE Ratings अश्या संस्थांचा समावेश होतो. या संस्था विविध क्षेत्रांमध्ये पत जोखमीचे निःपक्षपाती मूल्यांकन प्रदान करतात. त्यांचे मूल्यमापन सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीशी संबंधित जोखमींचे मूल्यांकन करण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरते.

पतमानांकन संस्थेची कार्ये

पतमानांकन संस्थेची अनेक कार्ये आणि जबाबदाऱ्या आहेत त्यापैकी काही महत्वाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.

क्रेडिट असेसमेंट: पतमानांकन संस्था फायनान्शिअल स्टेटमेन्ट, उद्योग गतिशीलता आणि कंपनी व्यवस्थापन यासारख्या घटकांवर आधारित कंपनीच्या आर्थिक स्थितीचे आणि परतफेड क्षमतेचे मूल्यांकन करते.

रेटिंग असाइनमेंट: पतमानांकन संस्था, कंपनी आणि आर्थिक साधनांना त्यांच्या योग्यतेवर आधारित क्रेडिट रेटिंग नियुक्त करते. सामान्यत: AAA (उच्चतम क्रेडिट गुणवत्ता) ते D (डिफॉल्ट) असे रेटिंग स्केल वापरले जाते.

नियमित देखरेख: पतमानांकन संस्था रेटिंग प्रदान केलेल्या संस्थांचे नियमित निरीक्षण करत असतात. आणि त्यांच्या बदलेल्या आर्थिक कामगिरी, उद्योग परिस्थितीनुसार दिलेल्या रेटिंग मध्ये योग्य ते बदल देखील केले जातात.

अहवाल जारी करणे: पत मानांकनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये पारदर्शकता आणि अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी संशोधन अहवाल, क्रेडिट ओपिनियन आणि रेटिंग तर्क पत मानांकन संस्था जारी करते.

क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे प्रदान केलेले मूल्यांकनाचा आर्थिक बाजारांवर लक्षणीय परिणाम होतो. त्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या विश्वासावर, कॉस्ट ऑफ बॉरोविंग आणि मार्केट लिक्विडीटीवर होतो. जास्त रेटिंग मिळालेल्या सिक्युरिटीज कमी जोखमीच्या असल्यामुळे अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करतात.

इतके महत्त्व असूनही, पतमानांकन संस्थांना अनेक आव्हाने आणि विवादांचा सामना करावा लागतो. ज्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आणि रेटिंग च्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

भारतातील क्रेडिट रेटिंग एजन्सी गुंतवणूकदारांसाठी आवश्यक मार्गदर्शक म्हणून काम करतात, पत जोखमीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देतात आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!