अजागळ / गलथान
“अजा” हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ बकरी. अजापुत्र म्हणजे बकरा किंवा बोकड. या प्राण्याला गळ्याशेजारी स्तनांसारख्या दोन मांसग्रंथी असतात परंतु, त्यातून दूध निघत नाही म्हणजे त्या निरुपयोगी ठरतात. त्यावरून “अजागलस्तन” हा शब्द रूढ झाला. याचेच रूप म्हणजे अजागळ. तसेच , ‘गलथान’ या शब्दात ‘थान’ म्हणजे ‘स्तन’ असे सूचित होते.
अजागळ म्हणजेच टापटीप नसलेला, अव्यवस्थित (मनुष्य) तर गलथान म्हणजे दिखाव्यापुरता पण उपयोगशून्य/ बेशिस्त (मनुष्य किंवा कारभार).
“अजापुत्रं बलिं दद्यात” म्हणजेच बकरा किंवा बोकड जसा काही अपराध नसताना बळी दिला जातो तसेच निरपराधी, निर्दोष माणसाला शिक्षा भोगावयास लावणे.